सामाजिक कृतज्ञता हा व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा अलंकार -माधुरी चौधरी
![]()
सामाजिक कृतज्ञता हा व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा अलंकार
माधुरी चौधरी
असोदा -शिक्षणातून माणसाला सजगता आणि व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते आपल्या शाळेप्रती, शिक्षणाप्रती कृतज्ञता बाळगणे हा व्यक्तिमत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा अलंकार असून तो सर्वांनी जोपासला पाहिजे असे मत माधुरी चौधरी यांनी सार्वजनिक विद्यालय असोदा येथे गरीब ,गरजू होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप प्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल होते. पर्यवेक्षक एल.जे.पाटील,डी जी महाजन विचार मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले डॉ.मिलिंद बागुल सर आपल्या वक्तव्यात म्हणाले की, सामाजिक बांधिलकी ही प्रत्येकाने जपली पाहिजे, त्यासोबतच व्यक्तीप्रती, समाजाप्रती करुणा आणि स्नेहभाव जगण्याला सुकर करत असते त्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी विद्यार्थी दशेपासूनच आपल्याला सामाजिक बांधिलकीची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगीनी महाजन तर आभार वृषाली .ए.चौधरी यांनी मानले.

