पापाशेठ वाघरे मित्रपरिवार यांच्याकडून महात्मा फुले हायस्कूल शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप !…
1 min read

पापाशेठ वाघरे मित्रपरिवार यांच्याकडून महात्मा फुले हायस्कूल शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप !…

Loading

पापाशेठ वाघरे मित्रपरिवार यांच्याकडून महात्मा फुले हायस्कूल शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप !…

  1. आमची शाळा आमचा अभिमान – सुरज वाघरे ( माजी विद्यार्थी )

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे पापाशेठ वाघरे मित्रपरिवार यांच्याकडून शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील उपशिक्षक पी डी पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाळेचे माजी विद्यार्थी पापाशेठ वाघरे, रवी करोसिया, संजयभाई पचेरवार, सुरजदादा वाघरे, प्रल्हाद पचेरवार उपस्थित होते.
शाळेच्या वतीने सर्व प्रमुख अतिथींचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वह्या, कंपास पेटी व पेन मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आले.
माजी विद्यार्थी सुरज वाघरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून थोडी अल्प मदत करण्याचा प्रयत्न पाठाशेठ वाघरे मित्रपरिवार यांच्याकडून आम्ही करत आहोत शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि आमची शाळा – आमचा अभिमान आहे असे प्रतिपादन वाघरे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस पवार यांनी या स्थुत्य उपक्रमाचे अभिनंदन करून मान्यवरांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी पाटील व आभार एस एन कोळी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *