अलौकिक कार्यकर्तृत्वाचे धनी म्हणजे राजर्षी शाहू महाराज – प्रा.डॉ.राहुल निकम. अमळगाव येथे राजर्षी शाहू महाराजजयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन.
1 min read

अलौकिक कार्यकर्तृत्वाचे धनी म्हणजे राजर्षी शाहू महाराज – प्रा.डॉ.राहुल निकम. अमळगाव येथे राजर्षी शाहू महाराजजयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन.

Loading

अलौकिक कार्यकर्तृत्वाचे धनी म्हणजे राजर्षी शाहू महाराज – प्रा.डॉ.राहुल निकम.
अमळगाव येथे राजर्षी शाहू महाराजजयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन.

राजर्षी शाहू महाराज यांचे जीवन कार्य ज्यावेळेस आपण अभ्यासतो त्यावेळी आपणास लक्षात येते की, शाहू महाराजांची जीवन हे विलक्षण घटनांनी भरलेले आहे. शाहू महाराजांचे व्यक्तिमत्व अलौकिक असून ते उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. बहुजनांच्या हितासाठी त्यांनी आपल्या संस्थानात राबविले कल्याणकारी कार्यक्रम ही त्याची साक्ष आहेत. आरक्षण, मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण, विविध जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी केलेली शिक्षणाची व्यवस्था, वस्तीगृहांची निर्मिती, बौद्धिक तसेच शरीर संवर्धनासाठी निर्माण केलेल्या व्यायामशाळा, महिलांच्या विकासासाठी निर्माण केलेले कायदे, राधानगरी धरणाची निर्मिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्यात केलेले सहकार्य इत्यादी बाबी त्यांच्या अलौकिक कार्याची साक्ष देतात असे मत प्रा.डॉ.राहुल निकम यांनी व्यक्त केले. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अमळगाव, तालुका अमळनेर या ठिकाणी ते बोलत होते.
प्रा. अशोक पवार यांच्या युवा कल्याण प्रतिष्ठान द्वारा संचलित राष्ट्रीय विचार अभियाना अंतर्गत राबविण्यात आलेल्या राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देणाऱ्या एक दिवशीय शंभर वक्ते आणि शंभर व्याख्यान या उपक्रमा अंतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून शंभर वक्त्यांच्या द्वारे शंभर ठिकाणी व्याख्यानांचे आयोजन करून राजश्री शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा परिचय करून देण्यात येणार आहे.
यावेळी विचार मंचावर अध्यक्षस्थानी आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शारदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा. सोपान भवरे हे होते.
सोपान भवरे यांनी सर्वांना शाहू महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष स्थानावरून बोलताना रवींद्र पाटील यांनी सन 2024 25 या शैक्षणिक वर्षातील हा पहिलाच उपक्रम असून असे अनेक विकासात्मक आणि प्रबोधनात्मक उपक्रम विद्यार्थी विकासाच्या दृष्टिकोनातून वर्षभर राबविण्यात येतील आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही दिली.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव पाटील पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील प्रदीप सुरडकर यांचेसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *