आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना भवन मुंबई येथे राज्यातील महिला उप नेत्यांची बैठक संपन्न
1 min read

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना भवन मुंबई येथे राज्यातील महिला उप नेत्यांची बैठक संपन्न

Loading

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना भवन मुंबई येथे राज्यातील महिला उप नेत्यांची बैठक संपन्न
देशातील लोकसभा निवडणुका व त्यापाठोपाठच राज्यातील शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विधानसभा निवडणुकीतील महिलांचा जास्तीत जास्त सहभाग शिवसेना पक्षाच्या बाजूने व्हावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राज्यातील सर्व प्रमुख महिला उपनेत्यांची काल दिनांक 27/6/2024 रोजी शिवसेना भवन दादर येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उत्तर महाराष्ट्राच्या वतीने नाशिक विभागाच्या उपनेते शुभांगी ताई पाटील या उपस्थित होत्या.
सदर बैठकीला शिवसेना महिला आघाडीच्या विशाखा ताई राऊत आणि किशोरी ताई पेडणेकर या प्रमुख होत्या. बैठकीत आगामी काळात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महिलांचा जास्तीत जास्त सहभाग व्हावा यासाठी सेनेच्या प्रमूख जबाबदारी देण्यात येणार आहे. त्या संदर्भात या बैठकीत चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर पक्षातील महिला आघाडीचे संघटन बांधणी व विस्तार तसेच येणाऱ्या काळात प्रत्येक निवडणुकीत महिलांचा प्रमुख सहभाग असावा या विषयावर आदरणीय रश्मी वहिनीसाहेब ठाकरे यांनी फोन वरून मार्गदर्शन केले. या बैठकीला राज्यातून विशाखा ताई राऊत ,किशोरी ताई पेडणेकर,रंजना ताई नेवाळकर,ज्योती ताई ठाकरे, राजुल ताई पटेल,संजना ताई घाडी,अस्मिता ताई गायकवाड,छाया ताई शिंदे,जाह्नवी ताई सावंत,शितल ताई देवरुखकर या उपनेत्या उपस्थित होत्या. सदर बैठकीचे वेळी महीला पदाधकर्यंतर्फे एकजुटीने निर्धार करण्यात आला कि, येण्याऱ्या विधानसभेला सबंध महाराष्ट्र पिंजून काढून महाविकास आघाडीचे सर्व च्या सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व महीला उपनेते यांनी शपथ घेतली व संकल्प केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *