जनतेच्या मनातील एक दूरदृष्टी असलेले झुंजार नेतृत्व अमळनेर चे माजी लोकप्रिय नगराध्यक्ष कै.देवाजी बुधा महाजन
1 min read

जनतेच्या मनातील एक दूरदृष्टी असलेले झुंजार नेतृत्व अमळनेर चे माजी लोकप्रिय नगराध्यक्ष कै.देवाजी बुधा महाजन

Loading

जनतेच्या मनातील एक दूरदृष्टी असलेले झुंजार नेतृत्व अमळनेर चे माजी लोकप्रिय नगराध्यक्ष कै.देवाजी बुधा महाजन

अमळनेर च्या इतिहासातील सोनेरी अक्षराने ज्यांचे नाव कोरले जाऊन अजरामर आहे.ज्यांनी अनेक लोकाभिमुख कामे करून जनतेच्या हृदयात आजही त्यांची जागा कायम आहे अमळनेरच्या विकासकामांना गती देऊन एक क्रांतिकारी विकास योद्धा म्हणून ज्यांचा उदय झाला ते अमळनेर नगरीचे माजी नगराध्यक्ष कै. देवाजी बुधा महाजन यांच्या स्मृती सप्ताह क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन साजरा करीत आहे.
आम्ही जिल्ह्यात किंवा तालुक्यातील ग्रामीण भागात सामाजिक कामे करीत असतांना अनेक आमचे जेष्ठ मार्गदर्शक नागरिक भेटतात तर आजही कै. देवाजी बुधा महाजन यांची ख्याती सांगतात त्यांचा कार्याचा लेखाजोखा सांगताना त्यावेळच्या भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना भेटून महाराष्ट्र शासना कडून मोठा निधी अनेक वर्षे खेचून अमळनेर च्या विकासासाठी सतत कामे केली आहेत.एक आदर्श व दूरदृष्टीचा नेता व एक विश्वास म्हणजे देवा शेठ देवा काका पाहिजे होता अजून काही वर्षे असेही खंत अनेकांनी बोलून दाखवली आहे.२६ जून हा काकांचा स्मृती दिवस! म्हणून क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले विचारमंच त्यांच्या स्मृतींना वंदन करून व कार्यांना उजाळा देऊन स्मृती सप्ताह राबवत आहे.अश्या महान दूरदृष्टी असलेले झुंजार लोकनेते कै.देवाजी बुधा महाजन यांच्या स्मृतीस वंदन!

प्रवीण बी.महाजन
संस्थापक अध्यक्ष
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले विचारमंच महाराष्ट्र प्रदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *