वाढदिवस विशेष,  मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आर .आर सोनवणे…
1 min read

वाढदिवस विशेष, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आर .आर सोनवणे…

Loading

 

वाढदिवस विशेष

मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आर .आर सोनवणे…

श्री आर.आर. सोनवणे यांनी त्यांच्या कारकीर्दीत प्रामाणिकपणे अध्यापन केले आणि तालुकास्तरीय क्रीडा विज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन प्रदान केले. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांनी अनेक बक्षिसे जिंकली आणि शाळेला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये मान मिळवून दिला.
सामाजिक सेवेला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले, विद्यार्थ्यांच्या हिताचे लक्ष ठेवत त्यांचे नेतृत्व गुण विकसित करण्यास प्रोत्साहन दिले. वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनामध्ये सक्रिय सहभागासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले.
सेवानिवृत्ती नंतरही, श्री आर.आर. सोनवणे यांनी आपण समाजाचे देणे लागते, या विचाराने विविध संघटनांच्या माध्यमातून कार्यरत राहून अविरत सहकार्य केले आहे.
ते एक आदर्श दांपत्य आहेत, त्यांच्या पत्नी सौ अर्चना सोनवणे या सुद्धा भिलाणे ता.शिंदखेडा तालुक्यात मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या मुलांना योग्य शिक्षण देऊन त्यांना विद्या विभूषित केले आहे. त्यांच्या पत्नी यांना जिल्हा परिषदेत आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
श्री आर.आर. सोनवणे यांचा सन्मान मराठी लाईव्ह न्यूजच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले..
त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द…
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
🎂💐🎂🎂🎂💐💐
ईश्वर आर महाजन पत्रकार अमळनेर
9860352960

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *