कष्ट, प्रेम आणि मार्गदर्शनाची ओळख – कै. रामचंद्र भामरे यांच्या जाण्याने हरवले एक मोलाचे व्यक्तिमत्व
![]()
कष्ट, प्रेम आणि मार्गदर्शनाची ओळख – कै. रामचंद्र भामरे यांच्या जाण्याने हरवले एक मोलाचे व्यक्तिमत्व
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) –
“कष्टातून घडलेले जीवन, प्रेमातून उभा परिवार; वडिल हेच आमचे अढळ आधार!”
कष्टाला जीवनाचे शस्त्र मानून जगणाऱ्या माझ्या वडिलांनी आयुष्यभर एकच धडा शिकवला—“परिवारासाठी जगणे हेच खरे मोठेपण.” स्वतःच्या सुखदुःखांची फिकीर न करता, अंगमेहनत काढत त्यांनी आमच्यासाठी मजबूत पायाभरणी केली. त्यांच्या तळहातावरचे घट्टे हे आमच्या भविष्यासाठी वाहिलेले घाम होते. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात आनंद फुलावा यासाठी त्यांनी स्वतःच्या इच्छा, आवडी, स्वप्नांना बाजूला ठेवून आयुष्यभर संघर्ष केला. जगात अनेक नायक पाहिले, पण आमचे खरे नायक तेच — आमचे बाबा. त्यांची साथ, त्यांची शिकवण, आणि दिलेलं नि:स्वार्थ प्रेम हेच आज आमचं सर्वात मोठं संपत्ती आहे. त्यांच्या कष्टात उभा राहिलेला आमचा परिवार आजही त्यांच्या मूल्यांना धरूनच उभा आहे… कारण वडील म्हणजे घराचा आधार नव्हे, तर घराची ओळख असतात. पण आमचा परिवार वडिलांच्या उनिवेने पोरका झाला आहे पण त्यांच्या आठवणी आमच्याकडे सदैव राहतील असे मनोज भाऊ भामरे यांनी सांगितले
मनोजभाऊ भामरे यांचे पिताश्री कै. भैय्यासो. रामचंद्र वामनशेठ भामरे यांचे दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने भामरे परिवार, नातेवाईक, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
कष्टातून उभं राहिलेलं जीवन — एक प्रेरणादायी प्रवास
कै. भैय्यासो भामरे यांनी आयुष्याची सुरुवात अत्यंत कष्टातून केली.
आईचे सावली लवकर डोक्यावरून गेल्यामुळे अवघ्या पाचव्या वर्षापासून त्यांनी स्वतः स्वयंपाक करणे, घरातील जबाबदाऱ्या सांभाळणे आणि बंधू—
भैय्यासो, रामचंद्र, वामन — या तिघा भावांचा परिवार सांभाळणे अशा कठीण प्रवासातून स्वतःला सिद्ध केले.
त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद होती त्यांची “जोड” – सामाजिक मान-सन्मान, आदर आणि नाती जपण्याची कला.
याच जोडेमुळेच त्यांनी कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणे उत्कृष्ट सुवर्णकार म्हणून नाव कमावले आणि पुढे स्वतःचे ज्वेलरी शॉप सुरू करून परिवाराचा संसार उभा केला.
साधेपणा आणि मितभाषी स्वभाव — त्यांची खरी ओळख
कै. भामरे यांचा स्वभाव अत्यंत मितभाषी, शांत आणि संयमी होता.
ते शब्दांपेक्षा कृतीतून, आवाजापेक्षा संस्कारातून बोलणारे व्यक्तिमत्व होते.
परिवारातील प्रत्येक सदस्याच्या प्रगतीत त्यांचा मूक पण खूप मोठा वाटा राहिला.
सद्गुरूंचे मार्गदर्शन
आयुष्यात आध्यात्मिक बळ म्हणून त्यांना
सद्गुरु नाना महाराज तराणेकर (इंदोर)
यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले होते.
त्यांच्या शिकवणुकीतूनच साधेपणा, सेवा आणि निस्वार्थपणाची मूल्ये त्यांनी जोपासली.
कुटुंब—त्यांचा अभिमान


त्यांच्या पश्चात—दोन मुलं : प्रमोद, मनोज उर्फ गजू भामरे दोन मुली : दीपिका (इंदोर), कामिनी (अहमदाबाद),जावई : धर्मेंद्र पंत (इंदोर), संजय पंत (अहमदाबाद)
सुना व नातवंडे असा मोठा, सुशिक्षित आणि सांभाळलेला परिवार आहे.
या सर्वांना एकत्र ठेवणारे बंधन म्हणजे कै. भैय्यासाहेब भामरे यांचे संस्कार आणि माया.
मुलांचा मितभाषी स्वभाव — वडिलांचा परंपरागत वारसा
जसा वडिलांचा संयमी, कमी बोलणारा आणि कामातून दाखविणारा स्वभाव होता,
तसाच स्वभाव त्यांच्या दोन्ही मुलांमध्येही दिसून येतो.
विशेषतः प्रमोदभाऊ, मनोजभाऊ भामरे यांनी अखेरपर्यंत वडिलांची अतिशय प्रेमाने आणि समर्पणाने सेवा केली.
परिवार, सुना, नातवंडे—सगळे मिळून त्यांनी वडिलांना आयुष्यभर जपले, सांभाळले.
एक अमूल्य व्यक्तिमत्व हरपले…
त्यांच्या जाण्याने भामरे कुटुंब पोरके झाले आहेत.
फक्त परिवारच नव्हे, तर सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातही त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव अनेकांना चटका लावेल.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.
त्यांच्या शिकवणुकीतून, त्यांच्या कष्टातून आणि त्यांच्या मितभाषी स्वभावातून
भामरे परिवार—आणि समाजही—नक्कीच प्रेरणा घेत राहील.
ॐ शांती.
💐💐💐💐💐
शब्दाकंन
ईश्वर आर महाजन
पत्रकार अमळनेर
9860352960

