1 min read

भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

Loading

भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी
आदर्श प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कार्तिक प्रशांत पवार यांनी स्विकारले.भगिनी मंडळ संस्थेच्या सदस्या उज्वलाताई शिरोडे मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंगलाताई सोनवणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. स्वरा महाजन, समिक्षा महाजन या लेकी जिजाऊंच्या वेशभूषेत आल्या होत्या. इयत्ता 1 ते 7 वी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रसंग जोशात, अंगावर शहारे येतील असे भाषणातून सादर केले.वेदिका बारी या विद्यार्थिनी सुंदर पोवाडा गायिला. कार्यक्रमाची सांगता अध्यक्षांच्या भाषणाने करण्यात आली. भगिनी मंडळ संस्थेच्या सदस्य सौ उज्वला ताई शिरोडे, मुख्याध्यापिका सौ मंगला सोनवणे, सौ शुभांगी कुलकर्णी,सौ सविता देशमुख यांच्या हस्ते उत्कृष्ट भाषण देणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका बाविस्कर मॅडम यांनी केले.सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमास श्रीमती ज्योतिर्मयी बाविस्कर, श्रीमती ललिता गवळी ,श्रीमती मनीषा गवते श्रीमती रूपाली पवार, श्रीमती दिपाली देसले, सौ वासंती काटे, सौ, तृप्ती खैरणार, श्रीमती राजश्री पाटील, श्रीमती विद्या पाटील ,श्रीमती नीता पाटील , वैशाली पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *