त्याग आणि सत्यवचनामुळेच सहकार चा कारवा वाढतोय !
![]()
त्याग आणि सत्यवचनामुळेच सहकार चा कारवा वाढतोय !
आधी दोघांच्या विजयाची निश्चिती म्हणजे सहकारची विजयाकडे वाटचाल

अमळनेर : पू सानेगुरुजी माध्यमिक शिक्षक व इतर नोकर वर्गाच्या पतपेढीत सहकार पॅनल च्या उमेदवारांची त्यागाची ,संयमाची भूमिका आणि त्यांच्या मदत व योगदानाची भूमिका ही पॅनलच्या पथ्यावर पडत असून पतंगाची विजयाकडे वाटचाल सुरू झाली आहे.
*पॅनल प्रमुख तुषार बोरसे , माजी अध्यक्ष के यु बागुल , माजी सचिव आर बी पाटील ,संचालिका कविता पाटील , सुलोचना पाटील ,वसुंधरा लांडगे ,जे एस पाटील या सारख्या संचालकांनी नव्या दमदार आणि शिक्षक शिक्षकेतर समाजाला उपयोगी पडणाऱ्या उमेदवारांकडे पतपेढी आणि नेतृत्वाची धुरा देण्याचा निर्णय घेतल्याने मतदारांना देखील आनंद झाला आहे. सहकार पॅनलच्या उमेदवाराना कुठेही रोषाला बळी पडावे लागत नाही. उलट यापूर्वी त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे. ठिकठिकाणी मिळणारा प्रतिसाद ही विजयाची नांदी आहे. वाट्टेल ते खोटे बरळण्यापेक्षा वास्तव भूमिका मांडल्याने मतदार सहकार पॅनलच्या धीर गंभीर वृत्तीचे स्वागत करीत आहेत. आज काय आणि उद्या काय बोलण्यापेक्षा चाकोरीबद्ध वक्तव्य करून सत्य परिस्थिती मतदारांसमोर मांडण्यात सहकार पॅनल यशस्वी ठरले आहे. अवास्तव आणि चिखलफेक करून मतदारांची मते आणि मने जिंकता येत नाही याची जाणीव सहकार पॅनेलची धुरा सांभाळणाऱ्या तज्ञ आणि जेष्ठ संचालकांना आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक उमेदवार आपली भूमिका परखडपणे मांडत आहेत. सहकार पॅनलच्या उमेदवारांनी खोटा आव आणून स्वतःची फसगत करून घेतली नाही किंवा फेकू वक्तव्य केलेली नाहीत त्यामुळे सहकार ची भूमिका मतदारांना चांगलीच भावली आहे यांना convince करता येत नाही म्हणून confuse करत आहेत 🙏🏻🙏🏻
सदैव आपल्या सेवेत
श्री तुषार नारायण बोरसे
संचालक माध्यमिक पतपेढी जळगाव, अध्यक्ष मुख्याध्यापक संघ अमळनेर 🙏🏻🙏🏻🙏🏻

