संत तुकाराम व्यवस्थेविरोधात विद्रोह करणारे संत
![]()

संत तुकाराम व्यवस्थेविरोधात विद्रोह करणारे संत
संत तुकाराम हे महाराष्ट्रातील संत परंपरेतील प्रखर मांडणी करणारे संत. तुकारामांचा जन्म 1608 रोजी पुणे जिल्हयातील खेड तालुक्यातील देहू ह्या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बोल्होबा तर आईचे नाव कनकाई होते. त्यांच्या घराण्यातील विश्वंबर बुवाची विठ्ठल भक्तीची परंपरा होती..आई व वडिल वारीला जात असत. घरची परिस्थिती फार श्रीमंतीची होती..वडील त्या परिसरातले मोठे सावकार होते. आसपासच्या सर्व खेडयातील लोक खरेदीखत लिहून त्यांच्याकडून पैसा घेत असत..लोकांकडून कमी व्याज घेऊन ते काम भागवत असत..संत तुकारामांना त्यांनी गावातच व्यवस्था करून शिकविले. तुकारामांच्या घरी बरेच धार्मिक ग्रंथ होते. त्यांचे पुर्वज विश्वंबर बुवाची परंपरा होती. अनेक ग्रंथाचे म्हणजे वेद, पुराण, भागवत, रामायण, महाभारत हे ग्रंथ वाचले होते. संत तुकारामांचे पहिले लग्न रुक्मिणी नावाच्या मुलीशी झाला होता. तिचे माहेर लोहगावचे होते. लोहगाव हे तुकारामांच्या मामाचे गाव होते. दम्याचा आजार लागल्याने ती वारली. तिला एक मुलगा होता. त्यानंतर आवली अथवा जिजाई नामक मुलीशी विवाह झाला. तिच्यापासून 6 अपत्ये झालीत. त्यांची नावे महादेव, विठोबा, नारायण, काशी, भागिरथी, गंगा अशी होती. देवाच्या खऱ्या भक्तीची दिशा नेमकी काय असावी याबाबत तुकाराम विचार करू लागले. पुरोहीतांचा देव व नामदेवांनी सुरू केलेली परंपरा यात फरक होता. संत नामदेवाची परंपरा समतेच्या विचाराची होती. पुरोहित लोकांना लुटत असत. 1629 ते 1630 ला भीषण दुष्काळ पडला. ह्या काळात बहुजनांचे अन्ना अभावी हाल होऊ लागले त्यावेळेस संत तुकारामांनी आपल्या भाऊला हिस्सा देऊन आपल्या हिस्याचे सर्व खरेदी खते, पैसा, ठेवी, शेतीची उतारे हे लोकांना वाटप करून दिली..सावकारी बंद केली. बहुजनांसाठी धान्य वाटप केली. खऱ्या ज्ञानाच्या वाटा संत नामदेवांच्या परंपरेतुन मिळाल्या होत्या..समाजातील विदारक भोंदुगीरीवर पर्याय शोधण्यास सुरुवात केली. भंडारा डोंगरावर जाऊन निवांत ठिकाणी अभंगाची रचना केली..गौतम बुध्दाच्या क्रांती प्रमाणे जागरण सुरु केले..संत तुकाराम हे विचारी पुरुष होते. भोंदूगीरीचे विरोधक होते. त्यांची प्रतिमा पुरोहितांनी नेभळट करुन ठेवली. ते प्रखर विद्रोही विचाराचे होते. त्यांनी समाजाला जागरूक करणारे सत्याची मांडणी असलेले अभंग लिहिले. त्यांनी कर्मकांडावर प्रखर युक्तीवाद केला. समाजात त्यांचे विचार पोहचू लागले. ते खरे वारकरी होते. त्यांनी अन्यायावर वार करण्यास सुरुवात केली. समाज जागरूक होऊ लागला. ते कर्मठ सनातन्यांना खटकत होते. पुरोहित लोकांनी त्यांना त्रास दयायला सुरुवात केली. तरीदेखील संत तुकारामांनी जनजागृतीचे काम थांबविले नाही. संत तुकाराम काम थांबवित नाही हे पाहून सनातन्यांनी त्यांच्या अभंग लिहिलेल्या वह्या इंद्रायणी नदीत बुडविल्या. परंतु लोकांच्या मुखोद्गत असलेले अभंग जीवंत राहिले. संत जगनाडे महाराज हे संत तुकारामांचे शिष्य होते त्यांनी ते मुखोद्गत असल्याने लिहून घेतले. जनमानसांच्या हृदयात बसलेले संत तुकाराम सनातन्यांना बाहेर काढता आले नाही. अभंग आजतागायत निरभंग ठरले. अखेर सनातन्यांनी ते वैकुंठगमनाला गेले असे भासविले. खऱ्या संताची अशी हालअपेष्टा केली. जीवंत माणूस आजपर्यंत कुणी वैकुंठाला गेल्याचे उदाहरण नाही ही काल्पनिक बदमाशी आहे. 1650 ला त्यांचे देहावसान झाले. त्यांनी दिलेली ज्ञानाची शिदोरी आजपर्यंत मार्गदर्शक ठरत आहे. ते खरे विद्रोही आहेत परिस्थितीला नमविणारे प्रखर संत आहेत.
एस. एच. भवरे
पत्रकार
9284695140

