देवगांव देवळी हायस्कूल मध्ये व्यसनमुक्ती व राम नाम घ्या ,भाग्य जगवा यावर मार्गदर्शन
![]()

देवगांव देवळी हायस्कूल मध्ये व्यसनमुक्ती व राम नाम घ्या ,भाग्य जगवा यावर मार्गदर्शन
अमळनेर प्रतिनिधी- देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती व रामनाम घ्या, भाग्य जगवा याच्यावर सविस्तर मार्गदर्शन कैवल्य ज्ञान विज्ञान परिवार रामद्वारा करण्यात आले..
बदलती जीवनशैली, कामाच्या अतिरिक्त ताणामुळे व्यसनांचे प्रमाण वाढले आहे. पण व्यसन हे जसे स्वत:साठी घातक असते. तसेच आपल्या कुटुंबासाठीही. कारण आपल्या व्यसनाचा त्रास हा कुटूंबाला होत असतो. त्यामुळे व्यसन मनापासून सोडणेही आवश्यक असते. त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणेही तितकेच गरजेचे आहे. अध्यात्माशी आपले नाते जोडले पाहिजे.. रामनाम घ्या भाग्य जगवा याच्यावरही त्यांनी सविस्तर असे मार्गदर्शन वक्ते उषाताई घाडगे भडगाव यांनी केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
वक्त्या उषाताई घाडगे व त्यांच्या टिमचे स्वागत शाळेचे शिक्षक आय.आर महाजन यांनी केले..
यावेळी भैय्यासाहेब साळुंखे अमळनेर, श्रीमती सुनंदाताई, रंजना साळुंखे ,माळी काका उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक आय आर महाजन, एस के महाजन, एच.ओ माळी ,अरविंद सोनटक्के व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले…

