आर .पी .पवार यांना तात्यासाहेब ज्योतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार
![]()

आर .पी .पवार यांना तात्यासाहेब ज्योतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार
अमळनेर तालुक्यातील लोंढवे हायस्कूल चे आर. पी. पवार एक उपक्रमशील शिक्षक होत .या शिक्षकाने आपल्या शाळेत कोणतेही काम प्रामाणिक ,तत्पर व आपला अमूल्य वेळ देऊन आतापर्यंत केलेले आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थी विविध उपक्रमात सहभागी करून त्यांना तालुका ते जिल्हा स्तरावर आणण्याचे नाविन्यपूर्ण काम केलेले आहे .कोणत्याही कामात स्वतःला झोकुन देण्याची वृत्ती त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. राष्ट्रसेवा दल या साने गुरुजींच्या चालत असलेल्या चळवळीत योगदान ते देत आलेले आहे. अगदी शांत संयमी ,प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित आहेत. कोणताही विषय असो त्याला योग्य न्याय देण्याचे कसब त्यांच्याकडे आहे .काम म्हणजेच आपला वशिला आहे हे ब्रीद त्यांनी पाळलेले आहे .स्वतःला चांगल्या पुस्तकांचे वाचन करण्याचा सुंदर छंद त्यांनी लावलेला आहे. शिक्षणासाठी अचूक प्लॅटफॉर्म कोणता आहे याची अद्यावत माहिती त्यांच्याजवळ आहे. कोणाचाही हेवा दावा न करता आपल्या कामाला संपूर्ण न्याय ते देतात .एक मेहनती शिक्षक ज्याला प्रसिद्धीची हाव नाही असा किमयागार शिक्षक म्हणून आर.पी .पवार सरांची ख्याती आहे .दिनांक 11 फेब्रुवारी ला प.न. लुंकड कन्या शाळा जळगाव शाळेत झालेल्या राज्य समता शिक्षक परिषदेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना तात्यासाहेब ज्योतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार शिक्षक आमदार किशोर दराडे व मॅक्स महाराष्ट्र मराठी चॅनलचे किरण सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिक्षकाला त्याच्या कामाची उत्तम पावती म्हणून हा पुरस्कार दरवर्षी उपक्रमशील शिक्षकांना दिला जातो .आर.पी. पवार संवेदनशील शिक्षक आहे..प्रत्येक कृती ते शाळेच्या हितासाठी व विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी करतात.नाविन्यपूर्ण प्रयोग ते राबवितात. विविध सामाजिक कार्यात त्यांचे योगदान असते..पुरस्कारासाठी प्रत्येक तालुक्यातून तीन शिक्षकांची निवड केली जाते .अगदी पारदर्शकपणे शिक्षकाच्या कर्तुत्वाला विचाराधीन घेऊन हा पुरस्कार दिला जातो. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य समता परिषद राज्याध्यक्ष भरत शिरसाठ जिल्हा सहसचिव एस . एच .भवरे समता परिषद प्राथमिक जिल्हाध्यक्ष अजय भामरे तसेच समता परिषद तालुका अमळनेर चे अध्यक्ष सर्जेराव सिसोदे त्याचप्रमाणे समता परिषद अमळनेर प्राथमिक विभाग अध्यक्ष बापूराव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे .अमळनेर तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांनी तसेच लोंढवे हायस्कूलच्या अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

