1 min read

सावनेर न.प.हायस्कूल मध्ये रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

Loading

सावनेर न.प.हायस्कूल मध्ये रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

आर एस पी बालसैनिकांमार्फत खऱ्या अर्थाने वाहतुकीचे नियमांची जनजागृती होईल.: पी एस आय विजयकुमार मुसनवार .

नागपूर( मनिलाल शिंपी ) नागपूर ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत ,
पोलीस स्टेशन सावनेर, जिल्हा-नागपूर यांचा मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल आणि नागरी संरक्षण संघटन नागपूर( RSP & CD) यांचा सहकार्याने
न.प.हायस्कूल सावनेर येथे, ३४ वा रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी
सावनेर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक भस्मे साहेब, पोलीस स्टेशन सावनेर हे प्रमुख अतिथी होते. तर हायवे सावनेर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मूसनवार यांच्यासह पोलीस हवालदार अंकुश शास्त्री वाहतुक विभाग, विशाल वडदे, संदीप गाडगे . अंकीत ठाकरे पोलीस कॉन्स्टेबल रूपाली कांबळे, आणी एम.एस गजभीए मुख्याध्यापक व जेष्ठ शिक्षक डी. एम.घोडे. तसेच पितांबर एस.महाजन, महासदेशक आर.एस पी अ‍ॅन्ड सी डी नागपूर, डि.एस. बले यांच्या उपस्थितीत वर्ग ९वी,१९ वी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम, गतीवर नियंत्रण, हेल्मेट चा वापर, सिट बेल्ट चा वापर, फूटपाथ चा वापर वाहतुक ईशारे, लायसन्स,इन्शुरन्स, पी.यू.सी. कागदपत्रासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली, सायकल चा वापर, जखमी व्यक्तीवर उपचार करणे, याबाबत मार्गदर्शन केले. आर एस पी अधिकारी युनिट ने पोलीस विभाग यांना सहकार्य करने ईत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक श्री पितांबर महाजन यांनी केले,
मुख्याध्यापक पितांबर महाजन यांचासह उपस्थित मान्यवर, पोलीस विभागातील सर्व पदाधिकारी या सर्वांचे बले सर यांनी आभार व्यक्त केले. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *