1 min read

उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित—–!!!

Loading

उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित—–!!!

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेतील उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे यांचा काल रविवारी 11 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचा राज्य, जिल्हा, विशेष पुरस्कार, तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमप . न. लुंकड कन्या विद्यालय जळगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता .कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे राज्य प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाट हे होते. तसेच पुरस्काराचे वितरण नाशिक विभाग शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी डायटचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे, डॉ. चंद्रकांत साळुंखे, डॉ. जगन्नाथ दरंदले, मधुकर कदम, शांताराम बडगुजर, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील ,शिक्षकांचे नेते एस .डी .भिरुड, संभाजी पाटील, डॉ. मिलिंद बागुल ,नारायण वाघ , टी . टी. सोनवणे ,गणेश काकडे, मिलिंद भालेराव ,धनराज मोतीराये, छाया बैसाणे प्रज्ञा तायडे सरिता वासवानी भारती,भारती ठाकरे आदी उपस्थित होते. सदरच्या पुरस्काराच्या निमित्ताने महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळ तसेच मुंदडा फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश भाऊ मुंदडा, चिटणीस नरेंद्र भाऊ मुंदडा ,सहचिटणीस योगेशभाऊ मुंदडा आधी सर्व कार्यकारणी संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक संदीप पवार, धनराज महाजन, नरेंद्र पाटील, प्रभाकर विंचुरकर, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू भगिनी, तसेच ,आप्तेष्ट मित्रपरिवार, पत्रकार ईश्वर महाजन ,अजय भामरे, बापूराव ठाकरे, विजय गाडे ,राहुल पाटील, आदींनीही अभिनंदन आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *