मारवड कला वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचा समारोप.—
![]()

मारवड कला वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचा समारोप.—
अमळनेर प्रतिनिधी
मारवड ता.अमळनेर येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित, कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवडचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिर मौजे गोवर्धन या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. आज दि. 12 /2/ 2024 सोमवार रोजी सकाळी ठीक 11 वाजता राष्ट्रीय सेवा योजनेचा समारोप समारंभ प्रमुख पाहुणे माननीय श्री. महादेव खेडकर (प्रांताधिकारी उपविभागीय अधिकारी अंमळनेर) आणि माननीय श्री. रुपेश कुमार सुराणा (तहसीलदार अमळनेर) यांच्या हस्ते झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आबाजीसो.श्री.देविदास बारकू पाटील (सेक्रेटरी ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड) हे होते. प्रमुख अतिथी म्हणून माननीय आबासो. जयवंतराव मन्साराम पाटील (अध्यक्ष ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड )
संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री. आबासाहेब देविदास शामराव पाटील तसेच संस्थेचे जेष्ठ संचालक माननीय श्री. भाऊसो. युवराज काशिनाथ पाटील, माननीय श्री. बापूसो.महारू रामदास सिसोदे ,माननीय श्री. दादासो.सुरेश भीमराव शिंदे, माननीय श्री. आबासो. चंद्रकांत रामराव शिसोदे, माननीय श्री. दादासो. राजेंद्र फकीरा पाटील, तसेच सर्व संचालक मंडळ आणि माननीय श्री. बापूसो शांताराम शामराव पाटील ,माननीय श्री. डॉ.प्रशांत दिलीपराव शिंदे, माननीय श्री. दादासो पंकज युवराज निकम (लोकनियुक्त सरपंच गोवर्धन बोरगाव ग्रामपंचायत) माननीय श्री. बापुसो.नरेंद्र शांताराम पाटील ,माननीय श्री. तात्यासो. अनिल निंबा पाटील (पंचायत समिती अंमळनेर) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाजमीन पठाण या विद्यार्थिनीने केले, तर सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.दिलीप कदम यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात N S S गीताने विद्यार्थ्यांनी केली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री. महादेव खेडकर प्रांताधिकारी साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोबाईलचा योग्य वापर करावा, आजचे युग हे माहिती तंत्रज्ञान, विज्ञान , स्पर्धेचे युग आहे. तरी अभ्यासात अधिक लक्ष घालावे. असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपआपले मनोगत व्यक्त केले,यात नियोजित प्रकल्प सक्षम युवा समर्थ भारत ,मतदान जनजागृती ,अभियान शाश्वत विकासात युवकांचे योगदान व शाश्वत ग्रामविकास, पंचप्राण, युवा संवाद, स्वच्छ भारत अभियान, विशेष मोहीम, शिक्षण अंतर्गत पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन ,पाणी व्यवस्थापन ,माजी वसुंधरा अभिमान ,ऊर्जा बचत काळाची गरज, इंडिया सक्षम भारत निर्माण करणे, इत्यादी असल्याने यासंदर्भात आकाश पाटोळे ,पूनम भिल ,कल्याणी पाटील,निकिता वाघ,संजय सोनवणे, शुभम पाटील या विद्यार्थ्यांनी शिबिराचे संदर्भात मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचे आभार कोमल पाटील या विद्यार्थिनींनी मानले. सदर N S S शिबिरास सर्व महाविद्यालयीन प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

