1 min read

वि.या.पाटील माध्य.विद्या. करणखेडे येथे किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी मासिकपाळी समुपदेशन सत्र”

Loading

वि.या.पाटील माध्य.विद्या. करणखेडे येथे किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी मासिकपाळी समुपदेशन सत्र”

अमळनेर प्रतिनिधी
श्रीमती सुवर्णा कौतिक धनगर (आरोग्य सेविका) प्राथमिक आरोग्य केंद्र हातेड बु. यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत समुपदेशन सत्रात वि.या. पाटील माध्यमिक विद्यालय करणखेडे ता.अमळनेर येथील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत’ विद्यार्थीनींना मार्गदर्शन तसेच त्यांच्या शंका, समस्यांचे निराकरण करतांना त्यांच्या आरोग्याची सर्वसाधारण माहिती देण्यात आली. बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयातच होत असलेल्या लठ्ठपणा, मधुमेह, डोळ्यांचे विकार यांसारख्या आजारांची माहिती दिली. तसेच आरोग्याची माहिती देत असतांना हात धुण्याच्या पद्धती सुद्धा कशा असाव्यात याचे प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून विद्यार्थ्यांना त्याचे महत्त्व पटवून दिले. सोबत श्रीमती कल्पना सिताराम सूर्यवंशी, श्रीमती अर्चना चंद्रमोहन सोनवणे तसेच विज्ञान शिक्षिक व मुख्याध्यापक श्री नंदकिशोर शंकरराव पवार व श्री आनंदा बापू धनगर तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री.साहेबराव विनायकराव पाटील, सर्व शिक्षक श्री अजय शामलाल पांडे,श्री मुरलीधर राजाराम चव्हाण, श्री प्रशांत यशवंत पाटील,शिक्षकेतर कर्मचारी श्री राजेंद्र गुलाबराव सोनवणे, व श्री किशोर शिवदास शिसोदे यांनी यशस्वीतेसाठी हातभार लावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *