1 min read

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, जळगाव च्या वतीने सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे भव्य आयोजन

Loading

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, जळगाव च्या वतीने सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे भव्य आयोजन

जळगांव प्रतिनिधी
जळगाव येथे गेल्या २४ वर्षासासून सार्वजनिक शिवजयंतीचे आयोजन करण्यात येते. या वर्षीदेखील सालाबादाप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्षपर्दी कुलभूषण पाटील यांची एकमतानेनिवड करण्यात आलेली आहे. तर उपाध्यक्षपदी एजाजभाई मलिक, नंदूभाऊ अडवाणी आणिरजनीकाका कोठारी यांची तर कार्याध्यक्षपदी जयश्रीताई महाजन, सचिवपदी राम पवार,खजिनदारपर्दी खुशाल चहाण असणार आहेत. सुकाणू समितीत प्रतिभाताई शिंदे, मुकूंदभाऊ सपकाळे, डॉ. राधेश्याम चौधरी, मुरलीधर महाजन, दिलीप तिवारी, चंदन कोल्हे, रविंद्र भावसार,कल्पेश कैलास सोनवणे, संग्रामसिंह राजपूत, अभ्धविनी देशमुख इत्यादी मान्यवर उत्सवसमिती प्रमुख असणार आहेत.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, ना. गिरीषभाऊ महाजन, ना. अनिलदादा पाटील, अप्पासो.गुलाबराव देवकर व मा. अशोकभाऊ जैन हे समितीचे मार्गदर्शक आहेत.
सर्व जाती, धर्म, समूह, विविध विचार प्रवाह या सगळ्यांना सोबत घेवून जयंती साजरी करणेहे सार्वजनिक शिवजयंतीचे वैशिष्ट्य आहे. महोत्सवारची सुरुवात दि. ११ रोजी पिंप्राळा येथिल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवप्रतिज्ञा घेवून सुरुवात होणार आहे.
दि. १५ रोजी किल्ले बनवा ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत आकर्षकबक्षिसे व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. किल्ले बनविण्यासाठी लागणारे साहित्यसमितीतर्फे पुरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचे प्रमुख पुरुषोत्तमआबा चौधरी असणार आहे. याबनविलेल्या किल्ल्यांचे प्रदर्शन व यासोबतच महेश पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेले आरमारप्रदर्शन दि. १६, १७ व १८ फेब्रुवारी असे तीन दिवस हे प्रदर्शन भाऊंचे उद्यानासमोर, काव्यरत्नावली चौकाजवळ सगळ्यांना बघण्यासाठी खुले असणार आहे.
दि. १७ रोजी पिंप्राळा येथे किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १८ रोजी शालेयस्तरावरील मूलांसाठी चित्र रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. जैन उद्योग समूह वकला अध्यापक संघाचे सहकार्य या स्पर्थला लाभले आहे. या स्पर्धित देखिल मूलांना सहभागप्रमाणपत्र व आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत.
दि. १९ रोजी भव्य शोभायात्रा निघणार आहे. सकाळी आठ वाजता ही भव्य शोभायात्राछत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून निधणार आहे. उत्सव समितीच्या वतीने महात्मा ज्योतिबाफ़ले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व छत्रपती संभाजी राजे जयंती निमित्त विविधकार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. दि. ६ जून रोजी राज्यभिषेक दिनाच्या दिवशी यामहोत्सवाची सांगता होणार आहे. छत्रपती शिवरायांची जयंती ते राज्यभिषेक दिन असं यामहोत्सवाचे स्वरूप असणार आहे. या महोत्सवात सर्व जातीधर्माच्या लोकांनी व विविध शैक्षणिकसंस्थांनी यात सामील व्हावं असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *