सभासद हितासाठी अपक्ष उमेदवार भरत पाटील यांची उमेदवारी…
![]()
सभासद हितासाठी अपक्ष उमेदवार भरत पाटील यांची उमेदवारी…
पूज्य साने गुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाची पतपेढीची निवडणुक


अमळनेर प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाची सह पतपढी अमळनेर पंचवार्षिक निवडणूक 2023- 28 या निवडणुकीत सर्वसाधारण जनरल मतदारसंघातील अपक्ष उमेदवार पाटील भरत विश्वासराव माध्यमिक विद्यालय नगांव गडखांब हे निवडणुकीत उभे असून त्यांची निशाणी छत्री आहे. तरी अमळनेर तालुक्यातील सर्व सभासद बंधू आणि भगिनींनो मला एक मत देऊन आपल्या सेवेची संधी द्यावी असे त्यांनी आवाहन त्यांनी पत्रकाद्वारे केले आहे..
सभासद बंधू-भगिनींना नम्र आवाहन व वचननामा
सन्माननीय सभासद बंधू व भगिनी आपण आपल्या मतदानरुपी आशीर्वाद मला दिल्यास मी संस्थेच्या विकासासाठी खालील विकासात्मक मुद्द्याच्या पूर्तता मिळून जाईल याची आश्वासन आपणास देऊ इच्छितो
१) सेवानिवृत्त सभासदांना सत्कार योजनेखाली रुपये 5000 ची ठेव पावती व सत्कार
२)सभासदांच्या मुलींच्या लग्नप्रसंगी कन्यादान योजनेखाली 25000 विवाह स्थळी भेट म्हणून देणे
३) सभासदांच्या वर्गणीवरील तीमाही व्याज आकारणी
४)जामीनकी कर्ज व्याज 7.50
५)स्पेशल कर्ज व्याज 9 टक्के करणे
६)मयत सभासदांच्या अर्थसहाय्य मयत निधीतून 80 हजार रुपये देणे व वेळोवेळी सभासदांच्या हितासाठी व संस्थेच्या प्रगतीसाठी ठोस निर्णय घेण्यात घेतले जातील
७) पतपेढीचे अँप च्या माध्यमातून सभासदांना आपले कर्ज व वर्गणी याबाबत अद्यावत माहिती देण्यासाठी प्रयत्नशील राहील..
सर्व सभासद बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की मी सर्वसाधारण जनरल मतदारसंघात क्रमांक ४ च्या छत्री या चिन्हावर विजय फुलीचा शिक्का मारून मला प्रचंड मतांनी विजयी करून संस्थेच्या सर्वांगीण विकास करण्याची संधी द्यावी… ही नम्र विनंती
असे आवाहन अपक्ष उमेदवार पाटील भरत विश्वासराव यांनी केले आहे….
मतदानाची ठिकाण
न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल कुंटे रोड पवन चौक अमळनेर


मतदान दिनांक
रविवार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत….

