1 min read

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात विद्यार्थ्यांनी केली पथनाट्यद्वारे जनजागृती.—

Loading

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात विद्यार्थ्यांनी केली पथनाट्यद्वारे जनजागृती.
मारवड येथील कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड यांच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात दत्तक ग्राम गोवर्धन येथे आज शिबिराच्या चौथ्या दिवशी श्रमदान करण्यासाठी रॅली काढली.
श्रमदानापूर्वी रॅलीने “सक्षम युवा समर्थ भारत” असा जयघोष केला. आणि या ग्रामच्या चौफुलीवर स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी ‘नशा करे दुर्दशा’ या पथनाट्याचे सादरीकरण करून ग्रामात जनजागृती केली.
या पथनाट्यामध्ये कु.नाजमीन पठाण,पूनम भील, अजय भील, गणेश मोरे,आकाश पाटोळे, निलेश गायकवाड आदींनी सदर पथनाट्य सादर केले,या पथनाट्यामधून ग्रामात जनजागृती झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *