1 min read

जेव्हा अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देतात तेव्हा……

Loading

जेव्हा अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देतात तेव्हा……

विद्रोही साहित्य संमेलनाचे पदाधिकारी यांनी केले स्वागत…

साहित्य संमेलनात तर्कवितर्क…

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.रविंद्र शोभणे यांनी अठरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलनात अचानक भेट दिली.मुख्य सभामंडपात प्रमुख चर्चासत्र सुरू असतांना मोठ्या लवाजमावासह डॉ. रविंद्र शोभणे यांनी भेट देत असतांना विद्रोहीच्या संयोजकांनी जेवणाचा आग्रह केला तर विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक रणजित शिंदे यांनी बळीराजा अन्न शिवारात डॉ.रविंद्र शोभणे यांचे तोंड गोड केले. डॉ.शोभणे यांनीही शिंदे यांना गोड खावू घातले.याप्रसंगी विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीचे स्थानिक अध्यक्ष गौतम मोरे, स्वागताध्यक्ष श्याम पाटील,मुख्य समन्वयक प्रा.अशोक पवार आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट
मी एक साहित्यिक असल्याने विद्रोही साहित्य संमेलनात माझे अनेक मित्र आहेत. साहित्य संमेलनाला भेटणे गैर नाही.. व साहित्यिकांना वेगवेगळे समजणे चुकीचे आहे. माझे बरेच लिखाण विद्रोही आहे. असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ रवींद्र शोभणे यांनी दिले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *