1 min read

रविंद्र सोनवणे लिखित ‘स्वप्नांच्या दुनियेत’ काव्य संग्रहाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशन..

Loading

स्वप्नांच्या दुनियेत काव्य संग्रहाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशन..

अमळनेर प्रतिनिधी
दिनांक – 2 फेब्रुवारी 2024 रोजी संमेलन अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक प्रा.डॉ. रविंद्र शोभणे तसेच बालमेळावा समन्वयक महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त आणि भारतातील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सुप्रसिध्द बालकवी एकनाथ आव्हाड साहेब. सुप्रसिद्ध कवी कथाकार विलास सिंदगीकर, केशवसुत पुरस्कार प्राप्त कविवर्य शशिकांत हिंगोणेकर साहेब यांच्या शुभहस्ते लेखक रविंद्र सोनवणे स्वप्नांच्या दुनियेत काव्य संग्रहाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ९७ वे‌ अमळनेर येथे प्रकाशन करण्यात आले.

स्वप्नांच्या दुनियेत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तरूणाईसाठी भन्नाट असा स्वप्नांच्या दुनियेत काव्यसंग्रह हा प्रचंड लोकप्रिय होईल.
आणि बालकवी एकनाथ आव्हाड, संमेलनाध्यक्ष डॉ रविंद्र शोभणे यांनी साहित्य क्षेत्रासाठी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *