1 min read

अमळनेरातील दिडशे वर्षाची परंपरा असलेले सांस्कृतिक केंद्र पू.सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय ,टाॅऊनहाॅल येथे साहित्य संमेलनानिमित्त येणार्‍या सारस्वतांना भेटीचे आवाहन

Loading

अमळनेरातील दिडशे वर्षाची परंपरा असलेले सांस्कृतिक केंद्र पू.सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय ,टाॅऊनहाॅल येथे साहित्य संमेलनानिमित्त येणार्‍या सारस्वतांना भेटीचे आवाहन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर शहरात वाडःमयीन व सास्कृतीक परंपरा आहे, याची साक्ष असलेले पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व लोकमान्य स्मारक समिती(टाऊन हाॅल) होय. हे ग्रंथालय पूर्वी व्हिक्टोरीया ज्युबिली लायब्ररी म्हणून सन १८७२ मध्ये स्थापन झाले. त्याकाळात वाचनसंस्कृती जोपासायचे कार्य या ग्रंथालयाने केले. अमळनेरात वैचारिक प्रबोधन व्हावे याहेतूने १९१८ मध्ये पीस मेमोरियल कमेटीची स्थापना झाली,यासंस्थेने त्यासाठी लोकमान्य टिळक सभागृहाची ग्रंथालयाच्या सहकार्याने टाऊनहाॅलची उभारणी केली,तेथे पूज्य सानेगुरुजी ग्रंथाल कार्यरत झाले. मराठी वाडःमय मंडळाची स्थापना सन १९५१ मध्ये झाली, तिन्ही संस्थांचे संचालक त्या काळात या शहरातील मान्यवर साहित्य प्रेमी होते. त्यांच्या कल्पक आयोजनातून “टाऊन हाॅल” या वास्तूत त्यावेळी गेल्या शंभर वर्षात अनेक साहित्यिकांची व्याख्याने परीसंवाद,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयौजन होत असे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करणार्‍या म.वां.मंडळाची जडण घडण याच वास्तुंमध्ये झालेली आहे हे सत्य स्विकारले पाहिजे.
पूज्य सानेगुरूजी ग्रंथालय हे शहरातील सर्वमान्य वाचनसंस्कृती जोपासणारे केंद्र आहे. या ग्रंथालयात अनेक विषयावरील जुने ग्रंथ उपलब्ध होत असतात, हे ग्रंथालय “अ” वर्ग श्रेणीतील तालुका ग्रंथालय असून शासनमान्य आहे. ग्रंथालयाची ग्रंथसंपदा २५००० हजारापेक्षा जास्त आहे, त्यात अनेक नामवंत साहित्यिकांची दुर्मिळ पुस्तके व संदर्भ ग्रंथ आहेतच त्यात विशेषत्वाने पूज्य सानेगुरुंजींची हस्तलिखिते व साहित्य उपलब्ध आहेत. ग्रंथालयाची सद्यस्थितीत स्वतंत्र वास्तु असुन त्यात हे ग्रंथालय सुरु आहे,संमेलनानिमित्त येणार्‍या सारस्वतांनी,प्रकाशकांनी सदर ग्रंथालयास भेट द्यावी अशी विनंती संचालकांतर्फे करणेत येत आहे. तसेच “टाऊन हाॅल” हे शहरांतील सांस्कृतिक केद्रं आहे पूर्वीचे पिस मेमोरियल कमेटीचे नांव बदलवून लोकमान्य टिळक स्मारक समिती म्हणून कार्यरत आहे, प्रशस्त क्रिडागंण,सुसज्य हाॅल शंभर वर्षापुर्वीच्या या देखण्या ईमारतीसह संमेलनास येणार्‍या मान्यवरांनी या ऐतिहासिक सांस्कृतिक केंद्र असलेल्या संस्थानी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन ग्रंथालयाचे चिटणिस प्रकाश वाघ व लोकमान्य स्मारच समितीचे चिटणिस प्रा.प्र.ज.जोशी यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *