विद्रोही साहित्य संमेलनात सृजनशील कार्यक्रमाची बालकांना व युवकांना मेजवाणी!!
![]()

विद्रोही साहित्य संमेलनात सृजनशील कार्यक्रमाची बालकांना व युवकांना मेजवाणी!!
अमळनेर शहरात येत्या 3/4 तारखेला विद्रोही मराठी साहित्य संमेलन होणार आहे. हया संमेलनात अनेक वैचारिक तसेच भावनिक जडणघडण होण्यासाठी अप्रतिम कार्यक्रम सादर होणार आहेत. बालक व युवक यांच्यासाठी बालमंच व युवामंच विचारपिठावर सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक4/02/2024 ला सकाळी 9 वा. सादर होणार आहेत. यात गीतगायन, काव्यवाचन, वक्तृत्व, एकपात्री प्रयोग, नाटीका, पथनाटय, मुकनाटय, समुहगीत त्यात पोवाडा, भारूड यासारख्या नाविन्यपूर्ण कार्यक्रम होणार आहेत..बालमंच व युवामंच च्या समिती प्रमुख एस. एच. भवरे व त्यांची समन्वय टीम मधील आर. जी. राठोड, एम. आर. तडवी,प्राध्यापक जितेंद्र माळी, प्राध्यापक दिलीप कदम, चंद्रकांत देसले सर, प्राध्यापक सुनिल वाघमारे, प्राध्यापक सतिष पारधी यांनी त्याबाबत काटेकोर नियोजन करून ग्रामीण भागातील विविध तालुक्यातील तसेच शहरी भागातील बालक व युवकांना त्यात न्याय दिला आहे. अगदी नाविन्यपूर्ण, कल्पक, सृजनशील, बोधपर कार्यक्रमांची मांडणी केलेली आहे. आपल्या देशाला भेडसावणाऱ्या समस्या, कर्मकांड, रुढी, परंपरा यामुळे होणारी राष्ट्रीयत्वाची हानी ,मोबाईलचे दुष्परिणाम, ड्रग चा तरूणावर आघात, कबीर, गाडगेबाबा, संत, तुकाराम यांच्यावर सुंदर नाटीका सादर होणार आहे. एकपात्री प्रयोगात जिजाऊ माॅ साहेब, सावित्रीमाई, हिरकणी,राणी लक्ष्मीबा फातिमा यासारख्या सुंदर भूमिका साकारल्या आहेत..भाषणात प्रभावी चिंतन केलेले आहे..गीत गायनात पुरोगामी गीते सादर होणार आहेत. बालमंच व युवामंच ह्या कार्यक्रमात बालमंच व युवामंच अध्यक्ष नाजमीन पठाण ही व तिची टीम त्यात भाविका वाल्हे, शैलजित शिंदे, स्नेहल शिसोदे, अजिंक्य सोनवणे हे सूत्रसंचालन, प्रास्ताविक,प्रमुख पाहुणे परिचय ही कामे सांभाळणार आहेत..अभिनव असा कार्यक्रम सादर होणार आहे..या कार्यक्रमासाठी पालकांना, शिक्षकांना तसेच साहित्य प्रेमी यांना उपस्थित राहण्याचे आयोजकांनी विनंती केली आहे..

