1 min read

पंचायत समितीच्या माजी सभापती
अनिता मराठे यांचे अल्पशा आजाराने निधन

Loading

पंचायत समितीच्या माजी सभापती
अनिता मराठे यांचे अल्पशा आजाराने निधन

आज 30 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 7.00 वाजता अमळनेर येथून राहत्या घरातून निघणार अंतयात्रा

अमळनेर प्रतिनिधी-कळमसरे येथील काही वर्ष नोकरीनिमित्त वास्तव्यास आलेलें सामाजिक कार्यकर्ते हरीष मराठे
यांच्या पत्नी अनिता हरीष मराठे (५६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले..
अनिता मराठे यांनी पंचायत समितीच्या सभापती पद असतांना अनेक विकासकामे केली होती.त्या मितभाषी होत्या. त्यांनी आपल्या दोन्ही मुली व मुलांवर चांगले संस्कार देत त्यांना शिक्षणाचे बाळकडू दिले.त्यांना काम करत असतांना पती व सामाजिक कार्यकर्ते व सेवानिवृत्त वायरमन हरीष मराठे यांची साथ व मार्गदर्शन मिळाले.
त्यांच्या अल्पशा आजाराने निधन झाल्याबद्दल नातेवाईक व परीवार व कळमसरे येथील मित्रपरिवार यांच्यावर दु:ख्ख कोसळले.त्यांच्या मागे पती दोन मूली,जावाई,मुलगा आहे…
यांच्या निधनाबद्दल शैक्षणिक, सामाजिक, राजकीय ,धार्मिक ,पत्रकारिता क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आला…

श्री हरीश परशुराम मराठे यांच्याकडून कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की, अमळनेर पंचायत समितीच्या माजी सभापती सौ अनिता हरीश मराठे ह्या दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी देवाज्ञा झाले. तरी त्यांची अंत्ययात्रा आज 30 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 7.00 वाजता अमळनेर येथून राहत्या घरातून निघणार आहे..
कळावे…
आपले शोकाकुल
श्री. हरीश परशुराम मराठे चि. कपिल हरीश मराठे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *