1 min read

संत गजानन महाराज मंदिरात
श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य शोभायात्रा..

Loading

संत गजानन महाराज मंदिरात
श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सामुदायिक रामरक्षा रामस्तुती आणि दीपोत्सव साजरा

अमळनेर प्रतिनिधी-
22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. देशातील
संपूर्ण मंदिर परिसरातील सजावाट करण्यात आली. श्रीराम जन्मभूमी आयोध्यामध्ये भक्तीमय वातावरण झालेलं आहे. याच धर्तीवर
अमळनेरला दादासाहेब जी.एम.सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात सजावट व विविध कार्यक्रमांचे आयोजन संत गजानन महाराज सेवा संस्थानचे अध्यक्ष प्रा.आर.बी.पवार व महीला वारीप्रमुख ज्योतीताई पवार यांच्या व गजानन महाराज परिवाराच्या वतीने
करण्यात आले…
राम अयोध्या मध्ये प्रभु श्रीरामचंद्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे तरी आपले सगळ्यांचे श्रध्दास्थान असलेले श्री संत गजानन महाराज मंदिरात देखील राम दरबार आहे.तरी आपण महिला पुरूष सगळ्यांनी मिळून सामुदायिक रामरक्षा रामस्तुती आणि दीपोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी गजानन महाराज परीवारातील बंधू व भगिनी व रामभक्त
आपआपल्या घरून वाती तेल टाकून पणत्या आणत दिपोत्सव साजरा करत रामाच्या भजनाने आजुबाजूचा परीसर भक्तिमय झाला… सगळ्या बंधू व भगिनी
आँरेज व लाल कलर परिधान करून आले होते…
संत गजानन महाराज मंदिरात महा आरती करण्यात आली व रामाच्या स्त्रोत सामुहिक गायन करण्यात आले… व नंतर कल्याण मारोती येथे महा आरती करण्यात आली.. यावेळी वाजतगाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. रामाच्या जयघोषात परीसर दुमदुमून गेला.लहाण व अबालवृद्ध मिरवणुकीत सहभागी झाले. यावेळी भटू पाटील, मोहीत पवार, सागर विसपुते, जयवंत पाटील, पुजेकरी रघूनाथ पाटील, विश्वास पाटील, अशोक भावे,कृष्णा भावे,उदयोजक अविनाश सोनार,पकंज येवले,
पप्पू कोळी,सनी पाटील, ईश्वर महाजन,संजय पाटकरी, सिद्धांत पाटील, भैय्या पाटील, विकास माळी,विजय येवले,सुनिल आप्पा,देवेंद्र चौधरी, कौस्तुभ पाटील, सुनिल शिंगाणे, प्रथमेश विफाळकर,तेजस पाटील, चेतन संजय चौधरी सह अनेक भाविक बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *