“अमळनेरमध्ये संत गजानन महाराजांचा प्रकट दिन: भक्तांच्या उत्साहात उपासना आणि आनंदाचा जलसा!”
1 min read

“अमळनेरमध्ये संत गजानन महाराजांचा प्रकट दिन: भक्तांच्या उत्साहात उपासना आणि आनंदाचा जलसा!”

Loading

“अमळनेरमध्ये संत गजानन महाराजांचा प्रकट दिन: भक्तांच्या उत्साहात उपासना आणि आनंदाचा जलसा!”

अमळनेर प्रतिनिधी:(ईश्वर महाजन)
संत गजानन महाराजांचा प्रकट दिवस हा एक अत्यंत विशेष आणि उत्सवी पर्व असून, दादासाहेब जी.एम. सोनार नगर, अमळनेर येथील संत गजानन महाराज मंदिरात यावर्षीच्या या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि आरती महाप्रसाद यांचे भव्य आयोजन करण्यात आले.

 

 

 

या दिवशी भक्त मंडळींचा उत्साह पाहण्यास मिळाला. अनेक भक्त गजानन महाराजांचे पूजन आणि अभिषेक करण्यासाठी पुनरागमन करत होते. वातावरण भक्तिमय आणि सुवासित होते, कारण विविध धार्मिक साहित्यांचे पारायण करण्यात आले आणि भक्ती गाण्यांच्या सुरांनी दिवसभर आनंदाचा जलसा सुरू होता.
दादासाहेब जी.एम. सोनार नगर येथील श्री गजानन महाराज मंदिरात प्रकट दिवस अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी सहा ते सात वाजता माऊलींचा अभिषेक व आरती दीपचंदशेठ अग्रवाल यांनी सहपत्नीक केली. यानंतर, सकाळी आठ ते दहा वाजेच्या दरम्यान लघुरुद्र अभिषेक पादुका पूजन नितीन भावे गुरुजी यांनी सहपत्निक केले.

 

 

 

 

सकाळी 11 ते 12 वाजेच्या दरम्यान गजानन महाराजांच्या महिला भक्तांनी सामूहिक चक्रीय पारायण मोठ्या उत्साहात केले. या पारायणानंतर माऊलींचा सत्संग संपन्न झाला, ज्यामध्ये तालुक्यातील व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील महिलांनी उपासना व कार्यक्रमाचा लाभ घेतला.
दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादासाठी अनेक गजानन भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी भक्तांची मोठी लाईन लागली होती, विशेषतः ग्रामीण भागातील महिला भक्तांनी वाढलेली उपस्थिती सर्वांना प्रेरित केली.
या सौभग्यशाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरुषोत्तम पाटील, चेतन उपासनी, प्रिया उपासनी, आणि मोहित पवार व मित्र परीवार यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. कार्यक्रमाचे नियोजन गजानन महाराज सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. आर. बी. पवार सर, महिला वारी प्रमुख ज्योतीताई पवार आणि सर्व गजानन परिवारातील सदस्यांनी मोठ्या मेहनतीने केले.
संत गजानन महाराजांची कृपा सर्व भक्तांवर सदैव राहावी, हीच या महान दिनाची प्रार्थना सर्वांनी एकत्रितपणे केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन परिवारातील सर्व बंधू भगिनींनी सहकार्य केले

 

 

 

चौकट
संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्ताने अमळनेर तालुक्याचे आमदार अनिल दादा पाटील, मा. जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, बजरंग सेठ अग्रवाल ,नीरज अग्रवाल, डॉ आर .बी बाविस्कर ,छोटू जैन, असे विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक,धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन गजानन महाराजांचा आशीर्वाद घेतला व महाप्रसादाचा लाभ घेतला. गजानन महाराज सेवा संस्थांनचे अध्यक्ष आर.बी पवार व महिला वारीप्रमुख ज्योतीताई पवार यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *