1 min read

शंख व खड्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी साकारली मानवी हृदयाची प्रतिकृती

Loading

शंख व खड्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी साकारली मानवी हृदयाची प्रतिकृती

अमळनेर प्रतिनिधी
शिरसाळे ता. अमळनेर येथील बी वाय चौधरी हायस्कूल व हिरामण जीवन पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबविण्यात येत आहे या अंतर्गत शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अश्याच एका उपक्रमांत इयत्ता आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वर्ग सजावट या उपक्रमात आपल्या वर्गात विविध प्रकारच्या मानवी शरीरातील अवयवांचे थीम सादर केले त्यात त्यांनी चक्क शाळेच्या मैदानावरील शंख व खडे गोळा केले व त्यापासून मानवी हृदयाची हुबेहूब प्रतिकृती साकारली मानवी हृदयाची रचना व कार्य याच महत्त्व विद्यार्थ्यानी सांगितले त्याच बरोबर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी खडे व शंख गोळा करून भारताच्या नकाशाची प्रतिकृती साकारली.याकरिता ज्येष्ठ शिक्षक कमलाकर संदांनशिव विज्ञान शिक्षक एन आर जैन व आर एन साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.मुख्याध्यापक पी ए भदाणे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *