आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलकांच्या मागण्यांसाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे साकडे
![]()

आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलकांच्या मागण्यांसाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे साकडे
ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी)आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या सुटाव्यात तसेच हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी शिष्टमंडळांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्या मागण्या व समस्या सोडवण्याचे आश्वासन माननीय मंत्री महोदयांनी दिले होते, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी लवकरात लवकर मिटींग लागावी म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदन आज दिले आहे.अशी माहिती
संपर्कप्रमुख महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटने संपर्कप्रमुख विष्णू विशे यांनी दिली आहे.

