1 min read

मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील यांना मातृशोक

Loading

मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील यांना मातृशोक

त्यांची अंत्ययात्रा २० रोजी दुपारी १ वाजता सबगव्हान येथून निघणार

अमळनेर प्रतिनिधी-
आईच्या जाण्याने प्रेमाची मायेची काळजीची अशी पोकळी निर्माण झाली आहे जी भरून काढणे कोणालाही शक्य होणार नाही आईच्या आठवणी मात्र कायम जिवंत राहतील .मुख्याध्यापक प्रकाश पाटील सर व त्यांच्या परीवाराने आईची मनोभावे सेवा केली.
अमळनेर तालुक्यातील सबगव्हान येथील देवकाबाई भिका पाटील वय ८५ यांचे १९ रोजी रात्री ८ वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा २० रोजी दुपारी १ वाजता सबगव्हान येथून निघणार आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले ,दोन मुली ,सुना ,नातवंडे ,जावाई असा परिवार आहे. त्या मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष व मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांच्या मातोश्री होत्या..

आता सहवास जरी नसला
तरी स्मृति सुगंध देत राहील,
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहिल.
भावपूर्ण श्रद्धांजली!
मुख्याध्यापक संघ जळगांव
ओबीसी शिक्षक असोसिएशन जळगांव
माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)
शिक्षक भारती संघटना
समता शिक्षक संघ अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *