मुख्याध्यापक संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनास शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची उपस्थिती
![]()

मुख्याध्यापक संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनास शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची उपस्थिती
मुंबई,ठाणे ( मनिलाल शिंपी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ मुंबई महामंडळाचे राज्यस्तरीय 62 वे अधिवेशन फैजपूर जळगाव या ठिकाणी जे टी महाजन महाविद्यालयांमध्ये आयोजित केले होते, या अधिवेशनास कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या सततच्या पाठपुरामुळे पहिल्यांदाच मुख्याध्यापक संघाच्या अधिवेशनाला महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दीपक जी केसरकर साहेब उपस्थित राहिले, त्यांच्या शिक्षण मंत्री कार्यकाळामध्ये आज पर्यंत शैक्षणिक गुणवत्ता वाढावी म्हणून शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी सातत्याने नवीन नवीन उपक्रम राबवल्याच्या सांगितले, तसेच शिक्षकांच्या विविध मागण्या सुद्धा आजपर्यंत पूर्ण केले आहेत, विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना 1160 कोटी रुपये अनुदान दिले , त्यातील अजूनही अनुदानापासून वंचित असलेल्या शिक्षकांना डिसेंबर पर्यंत 20%' अनुदान देणार, व एक जानेवारी 2024 पासून पुढील पुढील टप्पा वाढ देणार असे सांगितले, तसेच शेवटच्या वर्गाची पटसंख्या पुरेशी नसल्याने अनेक शाळा अनुदान पासून वंचित आहेत, त्यांच्याही बाबतीत सकारात्मक विचार करून त्यांनाही अनुदान देणार, त्याबाबतीत अधिकाऱ्यांना ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत, विद्यार्थी शिष्यवृत्ती मध्ये दुप्पट वाढ केली,शिक्षण सेवकांचे मानधन वाढवले, दप्तराचे ओझे कमी करावे म्हणून पाठ्यपुस्तकांमध्ये एकत्रित विषय करून त्यामध्ये वहीच एक पान जोडले आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश दिले, जूनियर कॉलेजमधील वाढीव पदांना मान्यता दिली, अल्पसंख्यांक शाळांमध्ये 50% शिक्षक भरती करण्याचा आदेश काढला, शिक्षकांच्या नावासमोर लवकरच TR. हा सिम्बॉल लावून शिक्षकांचा मानसन्मान वाढवला जाणार आहे, सदर सिम्बॉल चा वापर शिक्षकांना गाडीवर लावण्यासाठी, दारावरच्या पाटी वर नाव लिहिण्यासाठी व शिक्षकाची ओळख पटवण्यासाठी सदर सिम्बॉल चा वापर होणार आहे, केंद्र शासनाकडून खाजगी शाळांना , शासकीय सुविधा मिळत म्हणून प्रयत्न करत आहेत, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची भरती झाल्याबरोबर लगेचच पवित्र पोर्टल मार्फत खाजगी शाळेतील शिक्षकांची भरती होणार आहे, इत्यादी माहिती मनोगतातून शिक्षणमंत्री केसरकर यांनी सांगितले* *तसेच महाराष्ट्र राज्यातील मुख्याध्यापक हे शालेय गुणवत्ता वाढवण्यासाठी, विद्यार्थी हितासाठी सातत्याने अधिवेशनामध्ये चांगले विषय घेऊन विचार मंथन करतात त्याबद्दल मुख्याध्यापक संघाचे अभिनंदन केले व लवकरच मुख्याध्यापक महामंडळाचे शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी बैठकीसाठी आमंत्रित केले जाईल असेही सांगितले.माननीय दीपक जी केसरकर साहेब यांच्या उपस्थितीने व त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाने अधिवेशनासाठी आलेले राज्यातील मुख्याध्यापक बंधू भगिनी खूप खुश व आनंदी झाले, पहिल्यांदा शिक्षण मंत्र्यांनी उपस्थिती लावून अत्यंत सकारात्मक विचार मांडले अत्यंत सुंदर आणि देखने आणि शिस्तबद्ध अधिवेशन जळगाव जिल्ह्याने नियोजन केले होते , दोन दिवशीय अधिवेशनामध्ये विविध विषयांवर शोध निबंधांवर चर्चा करण्यात आली, राज्यातील 50 पेक्षा जास्त मुख्याध्यापक बंधू-भगिनींना गुणवंत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले , यावेळी मंचावर स्थानिक आमदार शिरीष दादा चौधरी, कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे , जे टी महाजन संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन , अधिवेशनाचे अध्यक्ष विजय पाटील , माजी अध्यक्ष सुभाष माने, महामंडळाची विद्यमान अध्यक्ष व आयोजक जेके पाटील, सचिव शांताराम पोखरकर , मागच्या अधिवेशनाचे अध्यक्ष महेंद्र गणपुले , मुख्याध्यापक महामंडळाचे पदाधिकारी, विविध जिल्ह्यातून आलेले मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व शेकडो संख्येने मुख्याध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते.अमळनेर तालुक्यातील मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील सह अनेक तालुक्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते.
अमळनेर तालुक्याचे मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील,माजी तालुकाध्यक्ष एम.ए.पाटील
यांचा शिल्ड व शाल देऊन शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांनी सत्कार केला..




