सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका-मदतनीसांना ग्रॅच्युइटीची रक्कम तातडीने अदा करण्याची मागणी , रामकृष्ण पाटील यांच्या नेतृत्वाखाली बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका व मदतनीसांना ग्रॅच्युइटीची रक्कम अदा करण्यात यावी, या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रामकृष्ण बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबर २०२५ मध्ये संबंधित सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी न्यायालयात दावे दाखल केले होते.
या दाव्यांवर सुनावणी होऊन न्यायालयाने सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे दावे मान्य केले असून, संबंधितांना एक लाख रुपयांपासून साडेतीन लाख रुपयांपेक्षा अधिक ग्रॅच्युइटीची रक्कम अदा करण्याचे आदेश दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
न्यायालयाच्या या निकालाची तातडीने अंमलबजावणी करून संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीची रक्कम निर्धारित मुदतीत अदा करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी संबंधित जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यासंदर्भातील नोटीसवजा निवेदन आज रामकृष्ण बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी संबंधित बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते. ग्रॅच्युइटीची रक्कम तातडीने अदा करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
*
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
गझलेची मैफल, साहित्यिकांच्या भेटीगाठी अन् आठवणींचा सुंदर प्र...
नगराध्यक्षा लिलाताई चौधरी व नगरसेविका ज्योती पाटील यांना "सम...
दुष्काळाच्या वणव्यात शेतकरी होरपळतोय; महाविकास आघाडीचा सरकार...
अमळनेरवासियांना आपल्या तालुक्याचा खासदार असल्याचा फायदा मिळत...
गझलेच्या दोन ओळींत उमटतो समाजाच्या वेदनांचा हुंकार! , ‘गझ...
ज्ञानाची सरस्वती, सेवाभावाची शक्ती अन् नेतृत्वाची दुर्गा! ...