Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयतालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी विद्यामंदिरचा प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड! ,‘प्रकाशाचे परावर्तन व दैनंदिन जीवनातील उपयोग’ या वैज्ञानिक उपकरणाची बाजी; शिक्षक गटातही तृतीय क्रमांक पटकावत विद्यालयाची दुहेरी यशस्वी कामगिरीविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयतालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी विद्यामंदिरचा प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड! ,‘प्रकाशाचे परावर्तन व दैनंदिन जीवनातील उपयोग’ या वैज्ञानिक उपकरणाची बाजी; शिक्षक गटातही तृतीय क्रमांक पटकावत विद्यालयाची दुहेरी यशस्वी कामगिरी
महाराष्ट्र विशेष बातमी

बियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन

ईश्वर रामदास महाजन 27 Oct 2026, 08:17 994 views अपडेटेड 28 Oct 2026, 02:02 10 min read
🔧 साधने:
बियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन    ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात ,   ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन

‘पुणे प्रतिनिधी

स्मृती, मैत्री, रहस्य, मानवी नातेसंबंध आणि आत्मशोध यांचा वेध घेणाऱ्या तरुण लेखक ओंकार काकडे यांच्या ‘बियॉन्ड द व्हाइट व्हेल’ या कादंबरीचे पुण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात प्रकाशन करण्यात आले. नयन प्रकाशन, मुंबई यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि संपादक संजय आवटे यांनी साहित्य, विचारस्वातंत्र्य, नव्या पिढीचे सामाजिक भान आणि स्वतंत्र विचारांची आवश्यकता यांवर भाष्य केले.

अध्यक्षीय समारोपात आचार्य डॉ. सुरेश सावंत यांनी मनाचे भावविश्व, आत्मशोध आणि भूतकाळातील आठवणींचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यांचा वेध घेत कादंबरीच्या वेगळेपणाचे कौतुक केले.

“व्यवस्थेला विचार करणाऱ्या माणसांची सातत्याने भीती वाटत असते. नवे प्रश्न निर्माण करणारा नवा लेखक समाजासमोर येणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन संजय आवटे यांनी केले. लेखन माणसाला समृद्ध करते आणि पुस्तकांमुळे त्याच्या विचारांच्या कक्षा रुंदावतात, असे सांगताना त्यांनी आजच्या बदलत्या सामाजिक आणि माध्यमविश्वातील स्वतंत्र विचारांच्या महत्त्वाकडे लक्ष वेधले. माध्यमांची संख्या वाढत असताना ही माध्यमे नेमकी कोणासाठी आहेत, हा प्रश्न प्रत्येकाने विचारायला हवा, असे ते म्हणाले.

आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात माणसाने स्वतः विचार करण्याची गरज अधोरेखित करताना आवटे यांनी, “मी विचार कधी करणार?” हा प्रश्न उपस्थित केला. यंत्रांवरील वाढत्या अवलंबित्वामुळे माणसाची स्वतंत्र विचार करण्याची क्षमता कमी होऊ नये, यासाठी सजग राहण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली. नव्या पिढीची भाषा, तिचे अनुभवविश्व आणि तिच्या अभिव्यक्तीची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे या पिढीला समजून घेऊन तिला सामाजिक भान देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे त्यांनी नमूद केले.

संत ज्ञानेश्वर महाराजांचा उल्लेख करताना त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना पहिले बंडखोर कवी असे संबोधले. साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते समाजाला विचार करायला लावणारे आणि माणसाच्या जाणिवा समृद्ध करणारे माध्यम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. लेखकाच्या लेखनातून त्याचे व्यक्तिमत्त्व, विचारप्रक्रिया आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन उलगडतो. उत्तम साहित्याने नव्या पिढीशी संवाद साधत तिच्या विचारविश्वाला नवी दिशा दिली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ओंकार काकडे यांच्या कादंबरीविषयी बोलताना संजय आवटे म्हणाले की, भूतकाळ हा आपण अनुभवलेला असतो आणि तो आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असतो. जुन्या आठवणींना उजाळा देणारी ही कादंबरी केवळ भूतकाळात घेऊन जात नाही, तर वर्तमानातील जगण्याचे भानही देते. माणसाला जगण्यासाठी बळ देणारी, आयुष्याकडे नव्याने पाहण्यास प्रवृत्त करणारी ही साहित्यकृती आहे. “ही कादंबरी भूतकाळाचा सुगंध आहे,” असे सांगत त्यांनी कादंबरीच्या आशयाचे विशेष कौतुक केले.

अध्यक्षीय भाषणात आचार्य डॉ. सुरेश सावंत यांनी आत्मचिंतन आणि मनाच्या आकलनाचे महत्त्व अधोरेखित केले. “मनाची परिभाषा आणि त्या परिभाषेला लाभलेली भूतकाळाची झालर हेच या कादंबरीचे खरे वैशिष्ट्य आहे,” असे ते म्हणाले. प्रत्येकाने स्वतःला ओळखले पाहिजे, स्वतःच्या मनाचा शोध घेतला पाहिजे आणि आपल्या नात्यांना जपले पाहिजे. माणूस जेव्हा स्वतःविषयी जागृत होतो, तेव्हाच त्याला स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याची दृष्टी प्राप्त होते, असे त्यांनी नमूद केले.

मनाच्या विविध पैलूंवर आजवर विपुल लेखन झाले असले, तरी मनाच्या भावविश्वाचा एका विशिष्ट परिघातून शोध घेत त्याला व्यापक आशय देण्याचा प्रयत्न ओंकार काकडे यांनी या कादंबरीतून केला आहे. मनातील भावभावना, आठवणी, अनुभव आणि मानवी नात्यांचे गुंतागुंतीचे संदर्भ यांना या लेखनातून अभिव्यक्ती मिळते. त्यामुळे वाचकाला केवळ कथानकाचा अनुभव येत नाही, तर स्वतःच्या आयुष्याकडे आणि मनाच्या भावविश्वाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी मिळते, असे त्यांनी सांगितले.

काळ कोणासाठीही थांबत नाही; तो सतत पुढे जात असतो. मात्र, काळाच्या प्रवाहात भूतकाळातील आठवणी आणि अनुभव माणसाच्या मनात कायम राहतात. जुन्या आठवणींचा सुगंध आपल्या जगण्याभोवती गुंफलेला असतो आणि त्यातूनच अनेकदा आपल्या वर्तमानाला अर्थ प्राप्त होतो. भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातील हे भावनिक नाते कादंबरीतून प्रभावीपणे व्यक्त झाल्याचे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. या कादंबरीतील आशयाचे वेगळेपण आणि मानवी मनाचा घेतलेला शोध लक्षात घेता, जागतिक स्तरावरही या साहित्यकृतीची दखल घेतली जाऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नयन बाराहाते यांच्या नावाने हे ‘प्रकाशन’ आहे याचा मला अभिमान वाटतो असेही डॉ. सावंत म्हणाले.

या प्रकाशन सोहळ्यात लेखक ओंकार काकडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. सनदी अधिकारी अशोक काकडे, संभाजीराव काकडे, डॉ. कुमार मांढरे, बालाजीराव शिंदे, राज देशमुख, श्रीकांतराव मोरे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हा व सत्र न्यायाधीश चंद्रकांत दातीर, लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर शोभाताई मोरे, डॉ. अनुषाताई मांढरे, शरदिनी काकडे आणि प्रकाशक सारिका पावडे-काळे यांनी कादंबरीच्या प्रकाशनानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि आपले विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले, तर आभार वृषाली काकडे-शहा यांनी मानले.

नयन प्रकाशनाच्या शंभराव्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा विशेष संदर्भही या सोहळ्याला लाभला. प्रकाशन क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण टप्प्याच्या निमित्ताने लेखक ओंकार काकडे यांच्या साहित्यकृतीचे स्वागत करण्यात आले. साहित्य, विचार आणि मानवी भावविश्व यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या या सोहळ्यात कादंबरीच्या आशयावर झालेल्या भाष्यामुळे उपस्थितांना साहित्याकडे अधिक चिंतनशील दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळाली.

———————————

फोटो ओळ : पुण्यात नयन प्रकाशनाच्या वतीने आयोजित सोहळ्यात तरुण लेखक ओंकार काकडे यांच्या ‘बियॉन्ड द व्हाइट व्हेल’ या कादंबरीचे प्रकाशन करताना ज्येष्ठ पत्रकार व संपादक संजय आवटे, डॉ. सुरेश सावंत आणि उपस्थित मान्यवर.

————————

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीअमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय पुढील बातमी →अमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षा

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!