युवकांना रोजगार-नव्या संधीचे आकाश* | प्रताप महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय राज्यस्तरीय रोजगार महाकुंभ मेळावा उत्साहात संपन्न ---------------------------------------- ● २५१ उमेदवारांची उपस्थिती, ● ८६ उमेदवारांची प्राथमिक निवड ● १२ बहू राष्ट्री

अमळनेर प्रतिनिधी: रोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय राज्यस्तरीय रोजगार महाकुंभ मेळावा–२०२६ खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथे मंगळवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला.
प्रस्तुत मेळाव्यात २५१ उमेदवारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला असून, विविध १२ कंपन्यांच्या प्रतिनिधींनी ८६ उमेदवारांची प्राथमिक स्तरावर निवड केली.
देशाचे मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रेरित तसेच महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले. यावेळी ऑनलाइन उपस्थिती मध्ये मंत्री जयकुमार रावल,मंत्री अदितीताई तटकरे, प्रशासकीय अधिकारी मनिषा वर्मा,आमदार मनिषा कायंदे आदींनी मार्गदर्शन केले.
उद्योग जगताच्या गरजा आणि रोजगाराच्या संधींच्या शोधात असलेले गुणवंत, प्रशिक्षित व रोजगारक्षम युवक यांना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने या रोजगार महाकुंभाचे आयोजन करण्यात आले. प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि संत सखाराम महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचा मुख्य उद्देश रोजगाराच्या शोधात असलेल्या पात्र युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि आवडीनुसार रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणे हा होता.
या अनुषंगाने विविध क्षेत्रांतील १२ प्रतिष्ठित कंपन्यांचे एच.आर. आणि अधिकृत प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यांनी उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची प्राथमिक स्तरावर निवड केली. या राज्यस्तरीय रोजगार महाकुंभ मेळाव्यास अमळनेरच्या तहसीलदार सौ. डॉ.उमा ढेकळे, खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री.विनोद अग्रवाल, उपाध्यक्ष श्री. कमल कोचर, विश्वस्त सौ. वसुंधरा लांडगे, संस्थेचे कार्याध्यक्ष सीए श्री. नीरज भाऊ अग्रवाल, संस्थेचे संचालक श्री.प्रदीप भाऊ अग्रवाल, श्री. हरी भिका वाणी, श्री. पंकज भाऊ मुंदडे, सौ. लीनाताई पाटील, प्रताप महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एच.डी.जाधव, श्री. सी. पी. चौधरी, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, जळगाव, श्री. जयेश एच. सूर्यवंशी, स्थानिक प्राचार्य, संत सखाराम महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमळनेर, संस्थेचे सहसचिव प्रा. डॉ. व्ही. बी. मांटे, उपप्राचार्य डॉ. ए. जे. पाटील, प्रा. डॉ. धीरज वैष्णव, सिनेट सदस्य, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, प्रा.जे सी अग्रवाल, डॉ.विजय तुंटे, डॉ.अमित पाटील,ग्रंथपाल दिपक पाटील तसेच श्री. विरभूषण पाटील, अभिषेक पाटील,सदस्य, जिल्हा रोजगार मेळावा समिती, जळगाव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री.नीरज भाऊ अग्रवाल यांनी रोजगारासाठी उपस्थित उमेदवार आणि विद्यार्थ्यांना संबोधित करून मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेसोबतच कौशल्य विकासावर भर देऊन उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या मेळाव्याच्या माध्यमातून युवक-युवतींना नामांकित कंपन्यांशी थेट संवाद साधण्याची, मुलाखतींना सामोरे जाण्याची आणि रोजगाराच्या संधी प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली. २५१ उमेदवारांचा सहभाग आणि ८६ उमेदवारांची प्राथमिक निवड ही या उपक्रमाची महत्त्वपूर्ण फलनिष्पत्ती ठरली.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रताप महाविद्यालयाच्या प्लेसमेंट व ट्रेनिंग सेलचे समन्वयक डॉ. विवेक बडगुजर तसेच डॉ. रामदास सुरळकर, डॉ. आर. एस. बाळस्कर व टीम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी टेक्निकल बाबींचे काम डॉ. किरण गावित,श्री दीपक चौधरी व श्री जय बडगुजर यांनी बघितले, तसेच नोंदणीचे काम प्रा. किरण भागवत, प्रा. महेंद्र महाजन, प्रा. भाग्यश्री जाधव व डॉ.प्रियंका पाटील यांनी पाहिले तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री विश्वास नाना पाटील, श्री संदीप सोनवणे व श्री बापू लोटन पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. हेमलता सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सौ. कविता गारे यांनी केले. रोजगाराच्या संधी आणि कौशल्य विकास यांची सांगड घालणारा हा रोजगार महाकुंभ मेळावा युवक-युवतींसाठी रोजगाराच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे,असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ हर्षवर्धन जाधव यांनी केले आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
अमळनेर महिला मंचच्या ४९ महिलांची पंढरपूर वारी; विठुरायाच्या ...
एका चिमुकल्या जीवासाठी माणुसकीचा हात पुढे करूया… अन्वीला उपच...
अमळनेर मतदारसंघात आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी शेतपाणंद ...
लोकमान्य टिळकांचा शैक्षणिक राष्ट्रवाद म्हणजे मेंदूच्या स्वात...
अभिव्यक्ती मंच, विरारतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्व...
आपत्ती व्यवस्थापनाला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व - श्...