अमळनेर तालुका कुस्ती-मल्लविद्या संघाची कार्यकारिणी जाहीर , कुस्तीची परंपरा घराघरांत आणि खेड्यापाड्यांत पोहोचविण्याचा निर्धार; २० पदाधिकाऱ्यांची निवड

अमळनेर तालुका कुस्ती-मल्लविद्या संघाची कार्यकारिणी जाहीर
कुस्तीची परंपरा घराघरांत आणि खेड्यापाड्यांत पोहोचविण्याचा निर्धार; २० पदाधिकाऱ्यांची निवड
अमळनेर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य कुस्ती-मल्लविद्या संघाच्या संयुक्त विद्यमाने कुस्ती आणि मल्लविद्येची परंपरा घराघरांत, गावागावांत आणि खेड्यापाड्यांत पोहोचविण्यासाठी संघटनात्मक पातळीवर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून संस्थापक अध्यक्ष श्री. मानगुडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, माजी नगरसेवक तथा कुस्ती-मल्लविद्या शहराध्यक्ष आबासो पै. प्रताप अशोक शिंपी तसेच कुस्ती-मल्लविद्या शहर प्रमुख पै. प्रविणकुमार शांताराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुका कुस्ती-मल्लविद्या संघाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला पारंपरिक खेळ असून, ग्रामीण भागातील अनेक होतकरू मल्लांना योग्य व्यासपीठ मिळावे, नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि कुस्ती-मल्लविद्येची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने संघाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अमळनेर तालुक्यात कुस्ती क्षेत्राला संघटित स्वरूप देण्यासोबतच मल्लांना मार्गदर्शन, प्रशिक्षण, स्पर्धांचे आयोजन आणि कुस्तीविषयक जनजागृती करण्यावर भर दिला जाणार आहे.
अमळनेर तालुका कुस्ती-मल्लविद्या संघाची नवनियुक्त कार्यकारिणी
1. आबासो पै. प्रताप अशोक शिंपी — तालुका प्रमुख
2. पै. प्रविणकुमार शांताराम पाटील — शहर प्रमुख
3. आबासो पै. संजय भिला पाटील — ज्येष्ठ मार्गदर्शक
4. अमोल चौधरी — प्रसिद्धी प्रमुख
5. आबासो पै. रावसाहेब गंगाराम पाटील — कार्याध्यक्ष
6. मा. पै. विनोद ओंकार निकम — तालुका ज्येष्ठ मार्गदर्शक
7. दादासो महेश रमेश पाटील — उपतालुका प्रमुख
8. किशोर श्रीकृष्ण पाटील — खजिनदार
9. पै. सिताराम वसंत पाटील — सचिव
10. भास्कर गंगाराम पाटील — संपर्क प्रमुख
11. पै. राजेंद्र आण्णा धनगर — उपतालुका प्रमुख
12. योगेंद्र विजय बाविस्कर — उपशहर प्रमुख
13. पै. गुलाब कोळी — ज्येष्ठ संपर्क प्रमुख
14. पै. राजेंद्र भाईदास पाटील — तालुका कार्याध्यक्ष
15. पै. प्रविण भाऊराव पाटील — कार्यकारिणी सदस्य
16. महेंद्र चौधरी — कार्यकारिणी सदस्य
17. पै. रतिलाल हरि पाटील — कार्यकारिणी सदस्य
18. चेतन वसंत पाटील — तालुका तांत्रिक समिती प्रमुख
19. पै. विठ्ठल सुखदेव पाटील — कार्यकारिणी सदस्य
20. पै. हरि ज्ञानदेव शेळके — कार्यकारिणी सदस्य
नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे कुस्ती-मल्लविद्या क्षेत्रातून अभिनंदन होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर तालुक्यातील कुस्ती क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. ग्रामीण भागातील युवा मल्लांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी संघाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
“कुस्ती घराघरांत, मल्लविद्या गावागावांत आणि गुणवंत मल्लांना योग्य व्यासपीठ” या उद्देशाने संघाची वाटचाल पुढे सुरू राहणार आहे.
शुभेच्छुक :
मा. नगरसेवक पै. प्रताप आबा शिंपी — तालुकाप्रमुख
पै. प्रविणकुमार शांताराम पाटील — शहर प्रमुख
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
ज्यूडोच्या आखाड्यात कृष्णा महाजनची विजयी झेप; विभागात अव्वल,...
विभागीय कुस्ती स्पर्धेत इंदिरा गांधी विद्यालयाचा दबदबा! क...
आंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत 'इकरा थीम' कॉलेजचे यश; जळगा...
राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल...
मैदान गाजले युवा खेळाडूंच्या जोशाने! ,अमळनेर तालुकास्तरीय...
कॅरमच्या पटावर पी.बी.ए.च्या विद्यार्थ्यांचा जलवा; १७ वर्षे व...