Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश

शालेय शासकीय फुटबॉल स्पर्धा अतिशय चुरशीच्या वातावरणात संपन्न , तालुक्यातील १७ संघांचा सहभाग; विजयी संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

ईश्वर रामदास महाजन 30 Sep 2026, 13:35 1.1K views अपडेटेड 24 Oct 2026, 03:35 5 min read
🔧 साधने:
शालेय शासकीय फुटबॉल स्पर्धा अतिशय चुरशीच्या वातावरणात संपन्न  ,  तालुक्यातील १७ संघांचा सहभाग; विजयी संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

अमळनेर प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, पंचायत समिती अमळनेर, शिक्षण विभाग अमळनेर व तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय शासकीय फुटबॉल स्पर्धा तालुका क्रीडा संकुल, मारवड रोड, अमळनेर येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत तालुक्यातील १७ फुटबॉल संघांनी सहभाग घेतला. अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या सामन्यांमुळे संकुल परिसरात संपूर्ण वातावरण क्रीडामय झाले होते. अनेक सामने अतिरिक्त वेळेत गेले, तर काही सामन्यांचा निकाल पेनल्टी शूटआऊटद्वारे लागला.

स्पर्धेचे उद्घाटन अमळनेर अर्बन बँकेच्या उपाध्यक्षा व खा. शि. मं.च्या विश्वस्त ताईसो. वसुंधराताई लांडगे, अमळनेर पोलीस अधिकारी व क्रिकेट अष्टपैलू खेळाडू श्री. समाधान गायकवाड, अर्बन बँकेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक श्री. अभिषेकभाऊ पाटील, प्रताप कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. ए. के. अग्रवाल, पोलीस श्री. मयुर पाटील, तालुका क्रीडा अध्यक्ष श्री. एस. पी. वाघ सर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांनी फुटबॉल व मैदानाचे पूजन करून श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन केले.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवर तसेच पंच अर्शद शेख, सागर चावरिया, अल्तमश सैय्यद, लकी चावरिया व जय जाधव यांचा बुके व शाल देऊन सन्मान करण्यात आला. उद्घाटनानंतर विविध गुणवंत खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला.

खेळाडूंनी मेहनतीने क्रीडा क्षेत्रात यश मिळवावे

यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधिकारी श्री. समाधान गायकवाड यांनी खेळाडूंनी मेहनत करून क्रीडा क्षेत्रात यश संपादन करावे, तसेच शासकीय सेवेत जाऊन देशसेवा करावी, असे आवाहन केले.

ताईसो. वसुंधरा लांडगे यांनी खेळाडू शिस्तबद्ध असतो, असे सांगत खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यांनी “हारी बाजी को जीतना हमें आता है...” हे गीत तालासुरात सादर करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

विविध गटांतील विजेते व उपविजेते

१४ वर्षे मुले :

विजेता – स्वामी विवेकानंद स्कूल, अमळनेर

उपविजेता – सेंट मेरी ई. मेडि. स्कूल, मंगरुळ

१४ वर्षे मुली :

विजेता – अॅड. ललिता पाटील ई. नॅश. स्कूल, अमळनेर

उपविजेता – स्वामी विवेकानंद स्कूल, अमळनेर

१७ वर्षे मुले :

विजेता – सेंट मेरी ई. मेडियम स्कूल, मंगरुळ

उपविजेता – स्वामी विवेकानंद ई. मेडि. स्कूल, अमळनेर

१७ वर्षे मुली :

विजेता – स्वामी विवेकानंद ई. नॅश. स्कूल, अमळनेर

उपविजेता – अॅड. ललिता पाटील ई. नॅश. स्कूल, अमळनेर

१९ वर्षे मुले :

विजेता – रॉयल उर्दू स्कूल अॅड. ज्यु. कॉलेज, अमळनेर

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी तालुक्यातील श्री. गोकुळ बोरसे, श्री. सुनील करंदीकर, श्री. विनायक सूर्यवंशी, श्री. विनोद पाटील, श्री. योगेश पाटील, श्री. जय जाधव, श्री. सागर चावरिया, अर्शद शेख व श्री. दर्शन पाटील यांनी सहकार्य केले.

विजयी संघ दि. १ ते ३ ऑक्टोबरदरम्यान भुसावळ येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत अमळनेर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या सर्व संघांना पुढील स्पर्धेसाठी उपस्थित मान्यवर व क्रीडाप्रेमींकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीसती माता मंदिर परिसरात माय भारत स्वयंसेवकांकडून प्लास्टिकमुक्त स्वच्छता अभियान पुढील बातमी →पिंपळे नाल्याच्या कथित अतिक्रमणाविरोधात २ ऑक्टोबरला अमरण उपोषण संयुक्त मोजणी, अतिक्रमणाचा पंचनामा करून दोषींवर कारवाईची भूषण भदाणे यांची मागणी

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!