सती माता मंदिर परिसरात माय भारत स्वयंसेवकांकडून प्लास्टिकमुक्त स्वच्छता अभियान

अमळनेर प्रतिनिधी : सेवा संकल्प अभियान व सेवा पंधरवाडा निमित्ताने सती माता मंदिर परिसरात प्लास्टिकमुक्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले. हे अभियान माय भारत अमळनेर तालुका स्वयंसेवक सागर कोळी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले. मेरा युवा भारत, जळगावचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एस.पाटील रासेयो कार्यक्रमाधिकारी विजयकुमार वाघमारे , प्रा.अनिता खेडकर यांच्या मार्गदर्शनाने या स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सती माता मंदिर परिसरातील प्लास्टिक व इतर कचरा संकलित करून परिसराची स्वच्छता केली. तसेच नागरिकांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत जनजागृती करण्यात आली. सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून स्वच्छ परिसर, सुंदर परिसर आणि प्लास्टिकमुक्त पर्यावरण असा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या स्वच्छता अभियानात तेजस्विनी, अनुजा, जान्हवी, रत्ना, कीर्ती, मयुरी, जान्हवी माळी, सुमित, क्रिश, धम्मदीप, कल्पेश, दीपक, सुशील आणि राजेंद्र या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
अमळनेर महिला मंचच्या ४९ महिलांची पंढरपूर वारी; विठुरायाच्या ...
एका चिमुकल्या जीवासाठी माणुसकीचा हात पुढे करूया… अन्वीला उपच...
अमळनेर मतदारसंघात आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी शेतपाणंद ...
लोकमान्य टिळकांचा शैक्षणिक राष्ट्रवाद म्हणजे मेंदूच्या स्वात...
अभिव्यक्ती मंच, विरारतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्व...
आपत्ती व्यवस्थापनाला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व - श्...