Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
महाराष्ट्र

अमळनेरमध्ये फार्मासिस्ट दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन; ८४ पोस्टर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रभावी सादरीकरण

ईश्वर रामदास महाजन 30 Sep 2026, 10:42 1K views अपडेटेड 20 Oct 2026, 16:42 5 min read
🔧 साधने:
अमळनेरमध्ये फार्मासिस्ट दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन; ८४ पोस्टर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रभावी सादरीकरण

अमळनेरमध्ये फार्मासिस्ट दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन; ८४ पोस्टर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रभावी सादरीकरण

अमळनेर प्रतिनिधी

खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी. फार्मसी आणि स्व.प्रा. र. का. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर येथे 'जागतिक फार्मासिस्ट दिनाचे' औचित्य साधून विविध स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

या निमित्ताने प्रश्नमंजूषा (Quiz), रील्स मेकिंग (Reels Making), स्कीटून्स (Skitoons), नाटक-पथनाट्य (Drama & Street Play) आणि पोस्टर प्रेझेंटेशन यांसारख्या विविध स्पर्धा पार पडल्या. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात तब्बल ८४ पोस्टर्स सादर झाली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या कलागुणांचे व कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. आरोग्य क्षेत्रात आणि औषध निर्माण शास्त्रामध्ये फार्मासिस्टचे असलेले महत्त्व, औषधांचा सुरक्षित वापर आणि जनजागृती याविषयी विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृती व सादरीकरणातून प्रभावी संदेश दिला. पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेच्या मूल्यमापनात प्रा. डॉ. शशिकांत जोशी, प्रा. हेमलता सूर्यवंशी व प्रा. वैशाली महाजन यांचे मोलाचे योगदान लाभल्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कल्याणी लांडगे आणि कु. रिमझिम तोलानी यांनी केले. कार्यक्रमादरम्यान फार्मसी महाविद्यालयाचे चेअरमन मा. योगेश मुंदडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आरोग्य आणि औषध निर्माण क्षेत्रात फार्मासिस्टचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून, समाजाच्या आरोग्याची जपणूक करण्यात त्यांची भूमिका कणासारखी असते. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता अशा स्पर्धांच्या माध्यमातून आपल्या कलागुणांचा विकास करावा आणि भविष्यात एक आदर्श व जबाबदार फार्मासिस्ट म्हणून देशाची सेवा करावी, असा संदेश त्यांनी आपल्या मार्गदर्शक भाषणात दिला.

प्राचार्य डॉ. धनंजय एम. पाटील यांनी आपल्या मार्गदर्शक भाषणात सांगितले की, आजच्या काळात औषधांचा सुरक्षित वापर, त्याविषयीची जनजागृती आणि औषध निर्माण शास्त्रातील नवनवीन बदल समजून घेणे फार्मसीच्या विद्यार्थ्यांना अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेझेंटेशन, नाटक आणि रील्स मेकिंगसारख्या उपक्रमांत दाखवलेला उत्साह त्यांच्यातील उपजत सर्जनशीलता दर्शवतो. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांचा सर्वांगीण विकास होतो.

तसेच समन्वयक प्रा. डॉ. एम. एस. वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. सतिष ब्राह्मणे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यात सामाजिक जाणिवा रुजवण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन नेहमीच प्रेरणादायी ठरते, असा सूर या वेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीअमरावती शिक्षक मतदारसंघातून प्रवीण पाटील सरांचे नाव पुढे शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी विधानपरिषदेत आवाज उठविण्याचा निर्धार पुढील बातमी →सती माता मंदिर परिसरात माय भारत स्वयंसेवकांकडून प्लास्टिकमुक्त स्वच्छता अभियान

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!