Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव! अमळनेर नगरपरिषदेच्या सभेत ठराव एकमताने मंजूर; शिवप्रेमींचा जल्लोष, पेढे वाटप आणि फटाक्यांची आतषबाजीअमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनधुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव! अमळनेर नगरपरिषदेच्या सभेत ठराव एकमताने मंजूर; शिवप्रेमींचा जल्लोष, पेढे वाटप आणि फटाक्यांची आतषबाजीअमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजन
महाराष्ट्र विशेष बातमी

धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव! अमळनेर नगरपरिषदेच्या सभेत ठराव एकमताने मंजूर; शिवप्रेमींचा जल्लोष, पेढे वाटप आणि फटाक्यांची आतषबाजी

ईश्वर रामदास महाजन 29 Oct 2026, 10:05 1K views अपडेटेड 29 Oct 2026, 11:11 4 min read
🔧 साधने:
धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव!     अमळनेर नगरपरिषदेच्या सभेत ठराव एकमताने मंजूर; शिवप्रेमींचा जल्लोष, पेढे वाटप आणि फटाक्यांची आतषबाजी

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर शहराच्या वैभवात भर घालणारा आणि समस्त शिवप्रेमींच्या अभिमानात वाढ करणारा महत्त्वपूर्ण निर्णय आज नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला **‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’** असे नाव देण्याचा ठराव सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी एकमताने मंजूर केला. या निर्णयाचे वृत्त समजताच अमळनेरमधील शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शिवप्रेमींनी नगरपरिषदेत उपस्थित राहून जल्लोषात या निर्णयाचे स्वागत केले.

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी नगरपरिसर दुमदुमला

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवराय’ अशा गगनभेदी घोषणांनी नगरपरिसर दुमदुमून गेला. यावेळी नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम आणि मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना पेढे भरवून शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केला. तसेच फटाक्यांची आतषबाजी करून या ऐतिहासिक निर्णयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

शिवप्रेमींसाठी अभिमानाचा क्षण

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या नावाने अमळनेर शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराची ओळख निर्माण होणे ही समस्त शिवप्रेमी आणि शिवभक्तांसाठी अभिमानाची बाब आहे. या नामकरणाच्या ठरावाला सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी एकमताने मंजुरी दिल्याने शिवप्रेमींनी समाधान व्यक्त केले. शहराच्या प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मिळावे, या भावनेला या निर्णयामुळे सकारात्मक दिशा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

आनंदोत्सवात शिवप्रेमींचा सहभाग

या आनंदोत्सवाप्रसंगी योगेंद्र बाविस्कर, भरत पवार, शुभम पाटील, उज्ज्वल पाटील, अनिरुद्ध शिसोदे, सागर विसपुते, राहुल कंजर, राहुल बडगुजर, अथर्व डेरे, राकेश शेटे, निनाद जोशी, राहुल अहिरे, भागवत पाटील, गणेश पाटील, गोकुळ पाटील, शाम पाटील, मनोज शिंगाणे आणि चिराग पाटील आदी शिवप्रेमी उपस्थित होते.

**जय जिजाऊ! जय शिवराय!**

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीअमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्न

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!