Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
महाराष्ट्र

वृत्तलेखन ही माहिती देण्यापुरती कला नसून प्रभावी संवादाचे माध्यम : डॉ. अंबादास भासके

स्पष्टपणा, परखडपणा आणि लोकहिताचे प्रश्न मांडणारे लेखन जनमानसात लोकप्रिय होते : डॉ. बापू चंदनशिवे
ईश्वर रामदास महाजन 21 Sep 2026, 07:33 977 views अपडेटेड 18 Oct 2026, 15:11 7 min read
🔧 साधने:
वृत्तलेखन ही माहिती देण्यापुरती कला नसून प्रभावी संवादाचे माध्यम : डॉ. अंबादास भासके
थोडक्यातकार्यशाळेच्या शेवटी दोन्ही प्रमुख मार्गदर्शकांचा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व पत्रकारांना प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देण्यात आले. पत्रकारांच्या लेखणीला कौशल्य, गुणवत्ता आणि अभ्यासपूर्ण वृत्तलेखनाचे बळ मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या अनोख्या वृत्तलेखन कार्यशाळेबद्दल अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा शाखेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पंढरपूर प्रतिनिधी :

वृत्तलेखन ही एक कला असून ती केवळ माहिती देण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर आजच्या काळात ती प्रभावी संवादाचे माध्यम बनली आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अंबादास भासके यांनी केले. तर वृत्तलेखनामध्ये स्पष्टपणा, परखडपणा आणि लोकहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडल्यास ते लेखन जनमानसात लोकप्रिय होते, असे मत न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगरचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. बापू चंदनशिवे यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वृत्तलेखन कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

जिल्ह्यातील पत्रकारांच्या लेखणीला आणखी धार यावी तसेच त्यांच्या वृत्तलेखन कौशल्याचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी मोफत वृत्तलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथील मास कम्युनिकेशन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अंबादास भासके तसेच अहिल्यानगर येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या मीडिया अँड मास कम्युनिकेशन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. बापू चंदनशिवे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

यावेळी अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, राज्य तांत्रिक सल्लागार नागनाथ सुतार, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, जिल्हा कार्याध्यक्ष तानाजी जाधव, शहराध्यक्ष सोहन जयस्वाल, तालुकाध्यक्ष नामदेव लकडे, मराठी पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र कोरके, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष अपराजित सर्व गोड, नगरसेवक दीपक चंदनशिवे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री विठ्ठल आणि आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने स्वागत करण्यात आले.

संघटनेच्या वतीने पत्रकारांसाठी राबविण्यात आलेले आरोग्य शिबिर, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच विविध उपक्रमांची माहिती आणि वृत्तलेखन कार्यशाळेची भूमिका जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केली. त्यानंतर वृत्तलेखन कार्यशाळेला सुरुवात झाली.

पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या कार्यशाळेला जिल्हाभरातून पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन्ही प्रमुख मार्गदर्शकांनी वृत्तलेखनाच्या विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. उपस्थित पत्रकारांनी मार्गदर्शकांनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे नोंदवून घेत आपल्या ज्ञानात भर घातली. व्याख्यानानंतर पत्रकारांच्या विविध शंका व प्रश्नांना प्रमुख मार्गदर्शकांनी खुलेपणाने उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.

संघाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रशांत माळवदे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले.

मार्गदर्शकांचा सन्मान; पत्रकारांना प्रशस्तीपत्र

कार्यशाळेच्या शेवटी दोन्ही प्रमुख मार्गदर्शकांचा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व पत्रकारांना प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देण्यात आले.

पत्रकारांच्या लेखणीला कौशल्य, गुणवत्ता आणि अभ्यासपूर्ण वृत्तलेखनाचे बळ मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या अनोख्या वृत्तलेखन कार्यशाळेबद्दल अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा शाखेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीआधार आरोग्य प्रकल्पांतर्गत आरोग्य मित्र प्रशिक्षण संपन्न पुढील बातमी →पेन्शनचा हक्क मिळेपर्यंत माघार नाही!’ , २८ सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आमरण उपोषणासाठी चोपड्यातून रणशिंग; पेन्शनपीडित कर्मचाऱ्यांची सहविचार सभा उत्साहात

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!