Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
महाराष्ट्र

पेन्शनचा हक्क मिळेपर्यंत माघार नाही!’ , २८ सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आमरण उपोषणासाठी चोपड्यातून रणशिंग; पेन्शनपीडित कर्मचाऱ्यांची सहविचार सभा उत्साहात

ईश्वर रामदास महाजन 21 Sep 2026, 08:48 1K views अपडेटेड 20 Oct 2026, 14:15 7 min read
🔧 साधने:
पेन्शनचा हक्क मिळेपर्यंत माघार नाही!’ ,   २८ सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आमरण उपोषणासाठी चोपड्यातून रणशिंग; पेन्शनपीडित कर्मचाऱ्यांची सहविचार सभा उत्साहात
थोडक्यातहा कुणा एकाचा लढा नाही… सर्वांच्या भविष्याचा प्रश्न!’ जुनी पेन्शनचा प्रश्न हा केवळ वेतन अथवा निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेचा विषय नसून हजारो कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी जोडलेला प्रश्न आहे. त्यामुळे कोणत्याही एका संघटनेपुरता हा लढा मर्यादित न ठेवता राज्यातील विविध जिल्ह्यांमधील समन्वय संघांचे पदाधिकारी आणि विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी एकत्र आले आहेत.

‘चोपडा प्रतिनिधी :

“ही लढाई कोण्या एका शिक्षकाची किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याची नाही, तर आपल्या सर्वांच्या भविष्याची आहे. २८ सप्टेंबरचा पहिला दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक पेन्शनपीडित बांधवाने आझाद मैदानावर कसे उपस्थित राहता येईल, याचा गांभीर्याने विचार करावा. सर्वांनी मनापासून सहभागी होऊन ही लढाई यशस्वी करावी,” असे भावनिक आवाहन जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष व मार्गदर्शक डॉ. शांताराम पाटील यांनी केले.

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेले तसेच टप्प्याटप्प्याने १०० टक्के अनुदानावर आलेले कर्मचारी, तसेच जुनी पेन्शनच्या प्रश्नासाठी लढा देणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहभागासाठी चोपडा येथे नुकतीच सहविचार सभा पार पडली. पंकज महाविद्यालयात झालेल्या या सभेत २८ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या आमरण उपोषणात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

‘हा कुणा एकाचा लढा नाही… सर्वांच्या भविष्याचा प्रश्न!’

जुनी पेन्शनचा प्रश्न हा केवळ वेतन अथवा निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेचा विषय नसून हजारो कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी जोडलेला प्रश्न आहे. त्यामुळे कोणत्याही एका संघटनेपुरता हा लढा मर्यादित न ठेवता राज्यातील विविध जिल्ह्यांमधील समन्वय संघांचे पदाधिकारी आणि विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी एकत्र आले आहेत.

“सर्वांनी विचारपूर्वक एकत्र येऊन हा लढा उभा केला आहे. विविध संघटनांचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर येणे हीच या आंदोलनाची मोठी ताकद आहे. आपल्या प्रश्नाला अनेक आमदार व खासदारांनी पाठिंबा दर्शविल्याने आंदोलनाला व्यापक पाठबळ मिळाले आहे,” असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

२८ सप्टेंबरला आझाद मैदानावर शक्तिप्रदर्शनाचे आवाहन

आझाद मैदानावरील आंदोलनाचा पहिला दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत उपस्थित मान्यवरांनी प्रत्येक पेन्शनपीडित कर्मचाऱ्याने आपली उपस्थिती सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. “आपल्या हक्कासाठी एक दिवस काम बाजूला ठेवून आझाद मैदानावर या. ही लढाई निर्णायक टप्प्यावर आली आहे. आपण एकजुटीने उभे राहिलो तर आपल्या मागणीची ताकद अधिक वाढेल,” असा सूर सभेत उमटला.

यावेळी अनेक मान्यवरांनी “ही शेवटची निर्णायक लढाई समजून सर्वांनी आझाद मैदानावर यावे; पेन्शनचा हक्क मिळविण्यासाठी एकजुटीने संघर्ष करूया,” असे भावनिक आवाहन केले.

चोपडा तालुक्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित

या सहविचार सभेला चोपडा तालुक्यातील अनेक पेन्शनपीडित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेदरम्यान आंदोलनाची दिशा, २८ सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर उपस्थिती वाढविण्यासाठी करावयाचे नियोजन आणि कर्मचारी बांधवांमध्ये जनजागृती करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष व मार्गदर्शक डॉ. शांताराम पाटील, अमळनेर मुख्याध्यापक संघाचे प्रकाश पाटील, प्रवीण पाटील, मंगेश भोईटे, पंकज विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, माने सर, कठोरा येथील मुख्याध्यापक सुनील पाटील, कमळगावचे मुख्याध्यापक प्रदीप न्यायदे, अडावदचे मुख्याध्यापक पिंपळे, लासूरचे बोरसे सर, सनपुळे येथील सुभाष पाटील, कोळंबा येथील वासुदेव महाजन, तसेच पंकज विद्यालयाच्या विजया पाटील मॅडम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

एकजुटीचा निर्धार; आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन

सभेच्या निमित्ताने पेन्शनपीडित कर्मचारी बांधवांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पेन्शनच्या प्रश्नासाठी आता संघटितपणे आणि मोठ्या संख्येने आवाज उठविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

“आपला प्रश्न एकट्या व्यक्तीचा नाही; हजारो कुटुंबांच्या भविष्याचा आहे. त्यामुळे मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एका झेंड्याखाली एकत्र यावे,” असा संदेश सभेतून देण्यात आला.

---

चौकट

अमळनेरमध्ये आज सहविचार सभा

आज सायंकाळी ५ वाजता मुंदडा हायस्कूल, अमळनेर येथे जुनी पेन्शनपीडित कर्मचाऱ्यांसाठी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

अमळनेर तालुक्यातील सर्व पेन्शनपीडित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन अमळनेर तालुका अध्यक्ष प्रभुदास पाटील यांनी केले आहे.

२८ सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुक्यातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि पुढील नियोजनाबाबत या सभेत चर्चा होणार आहे.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीवृत्तलेखन ही माहिती देण्यापुरती कला नसून प्रभावी संवादाचे माध्यम : डॉ. अंबादास भासके पुढील बातमी →मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा श्री मंगळग्रह मंदिरात जमला भक्तीचा सागर; धार्मिक विधींमुळे दिवसभर चैतन्य

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!