Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
महाराष्ट्र विशेष बातमी

अमळनेर महिला मंचच्या ४९ महिलांची पंढरपूर वारी; विठुरायाच्या चरणी भक्तिरसात न्हाऊन निघाली भजनांजली! प.पू. ह.भ.प. प्रसाद महाराजांच्या आशीर्वादाने तीन दिवसीय तीर्थयात्रा उत्साहात संपन्न;

ईश्वर रामदास महाजन 26 Oct 2026, 11:27 1.2K views अपडेटेड 28 Oct 2026, 02:31 11 min read
🔧 साधने:
अमळनेर महिला मंचच्या ४९ महिलांची पंढरपूर वारी; विठुरायाच्या चरणी भक्तिरसात न्हाऊन निघाली भजनांजली!     प.पू. ह.भ.प. प्रसाद महाराजांच्या आशीर्वादाने तीन दिवसीय तीर्थयात्रा उत्साहात संपन्न;

अमळनेर, प्रतिनिधी :

भक्ती, श्रद्धा, संतपरंपरा आणि विठ्ठलनामाच्या गजराने मन भारावून टाकणारा अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव अमळनेर महिला मंच ट्रस्टच्या ४९ महिला भगिनींनी घेतला. प.पू. ह.भ.प. प्रसाद महाराज यांच्या आशीर्वादाने आयोजित करण्यात आलेली पंढरपूर तीर्थयात्रा २१ ते २४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. या यात्रेत कुंथलगिरी, तुळजापूर, अक्कलकोट आणि पंढरपूर या पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत महिलांनी विठुरायाच्या चरणी भजनांजली अर्पण केली. विशेष म्हणजे, पंढरपूर येथे प्रसाद महाराजांच्या सान्निध्यात नगरप्रदक्षिणा आणि भजनसेवेचा लाभ मिळाल्याने या यात्रेने सर्वांच्या मनात भक्तीचा अविस्मरणीय ठसा उमटविला.

कुंथलगिरीच्या पवित्र भूमीतून तीर्थयात्रेचा प्रारंभ

२१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता अमळनेर येथून ‘माँ गायत्री’ यात्रा कंपनीच्या स्लीपर कोचने ४९ महिला भगिनींच्या यात्रेचा प्रारंभ झाला. दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता जैन धर्मीयांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या कुंथलगिरी येथे आगमन झाले. भगवान कुलभूषण आणि भगवान देशभूषण या दोन बंधूंनी मोक्षपद प्राप्त केल्याची धार्मिक मान्यता असलेल्या या पवित्र स्थळी तीर्थस्नान आणि अल्पोपाहार करून पुढील प्रवासाला सुरुवात करण्यात आली.

कुलस्वामिनी तुळजाभवानी आणि स्वामी समर्थांचे दर्शन

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्ण शक्तिपीठ मानल्या जाणाऱ्या तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनाने महिलांच्या मनात भक्तिभाव जागृत झाला. देवीचे दिव्य रूप डोळ्यांत साठवून महिला पुढे श्री स्वामी समर्थ महाराजांची कर्मभूमी आणि समाधिस्थळ असलेल्या अक्कलकोट येथे पोहोचल्या. स्वामी समर्थांच्या पवित्र सान्निध्यात काही काळ घालवून त्यांनी रात्री पंढरपूरकडे प्रस्थान केले.

पहाटेच्या नगरप्रदक्षिणेत प्रसाद महाराजांचे सान्निध्य

२२ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर पंढरपूर येथे आगमन झाल्यानंतर महिला भगिनींना पहाटेच्या भक्तिमय सोहळ्याची उत्सुकता लागली होती. सद्गुरू सखाराम महाराज वाडी संस्थानचे ११ वे विद्यमान गादीपती प.पू. ह.भ.प. प्रसाद महाराज यांच्या सोबत पहाटे ३.३० वाजता नगरप्रदक्षिणेचा लाभ मिळाला. हा क्षण सर्वांसाठी अत्यंत भावस्पर्शी ठरला.

महाराजांच्या दर्शनासाठी आणि त्यांना साष्टांग दंडवत घालण्यासाठी ठिकठिकाणी भाविकांची गर्दी जमली होती. पुढे कंदील घेऊन चालणारे दिवटीकरी, त्यांच्यामागे प्रसाद महाराज आणि त्यानंतर चालणाऱ्या अमळनेरच्या महिला भगिनी, असा भक्तिमय सोहळा अनुभवताना जणू परमेश्वराच्या अस्तित्वाची अनुभूती होत होती.

कठोर आचारधर्म, आजन्म ब्रह्मचर्य, विरक्त जीवन आणि अखंड नामस्मरण यांतून संतत्वाची उंची गाठता येते, याची जाणीव या प्रसंगाने करून दिली. चातुर्मासात शेकडो भाविक महाराजांच्या मठात वास्तव्यास राहून ज्ञानेश्वरीचे पठण करतात आणि ईश्वरभक्तीत तल्लीन होतात. महाराजांप्रती असलेली भाविकांची अपार श्रद्धा आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होणारे भक्त पाहून महिला भगिनी भारावून गेल्या. या वातावरणाने जीवनाकडे पाहण्याची नवी उमेद दिली.

आई रुख्मिणीच्या सभामंडपात अमळनेरच्या महिलांची

सुरेल भजनांजली

पंढरपूर दर्शनानंतर दुपारी ३ वाजता आई रुख्मिणीच्या सभामंडपात अमळनेरच्या महिला भगिनींनी भक्तिसंगीताची सुरेल मैफल सादर केली. चंद्रभागा ग्रुप, इंद्रायणी ग्रुप, भीमा ग्रुप आणि नर्मदा ग्रुप यांनी एकापेक्षा एक सरस भजने सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण सभामंडप विठ्ठलनामाच्या गजराने आणि भक्तिरसाने भारावून गेला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी केले. भजन सादर करणाऱ्या सुवासिनींची ओटी भरून त्यांचा सन्मान करण्यात आला. भक्तिसंगीताच्या माध्यमातून अमळनेरच्या महिलांनी आपल्या गावातील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे सुंदर दर्शन घडविले.

विठुरायाच्या चरणस्पर्शाने महिलांची भक्तीभावना झाली द्विगुणित

पांडुरंगाच्या दर्शनाची आस प्रत्येक वारकऱ्याच्या मनात असते. मंदिरात दर्शनासाठी अनेकदा तासनतास रांगेत उभे राहावे लागते; मात्र अमळनेरच्या महिला भगिनींना पांडुरंगाच्या चरणांवर मस्तक टेकविण्याचा लाभ मिळाला. प.पू. ह.भ.प. प्रसाद महाराज यांच्या उपस्थितीमुळे आणि आशीर्वादामुळे हा अविस्मरणीय क्षण अनुभवता आल्याची भावना महिलांनी व्यक्त केली.

रात्री भोजनानंतर महिला भगिनींनी प्रसाद महाराजांना पोशाख अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली. त्यावेळी महाराजांनी प्रत्येक भगिनीला विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती, ओटी आणि पुस्तक देऊन सन्मानित केले. आपल्या गावातील संतपरंपरा पंढरपूरसारख्या पवित्र तीर्थक्षेत्री जतन आणि संवर्धित होत असल्याचा अभिमान सर्व महिलांच्या मनात दाटून आला.

आषाढी आणि कार्तिकी यात्रेच्या काळात हजारो वारकऱ्यांना दररोज महाराजांच्या मठात भोजनाचा लाभ मिळतो. सेवा, समर्पण आणि भक्तीचा हा वारसा संतपरंपरेचे श्रेष्ठत्व अधोरेखित करणारा असून, अमळनेरकरांसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे.

भक्तीच्या आठवणी हृदयात साठवून अमळनेरकडे परतीचा प्रवास

पंढरपूरमधील भक्तिमय वातावरण, संतांचे सान्निध्य, नगरप्रदक्षिणा, भजनांजली आणि विठुरायाच्या चरणस्पर्शाचा आनंद हृदयात साठवून महिला भगिनींनी जड अंतःकरणाने प्रसाद महाराजांची आज्ञा घेतली. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता सर्व महिला अमळनेर येथे परतल्या. ही यात्रा केवळ तीर्थदर्शनापुरती मर्यादित न राहता श्रद्धा, एकात्मता, संस्कार आणि आध्यात्मिक आनंदाची अनमोल शिदोरी देणारी ठरली.

मान्यवरांचे सहकार्य आणि महिला मंच पदाधिकाऱ्यांचे योगदान

तुळजापूर येथे कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी मा. आमदार दादासाहेब अनिल पाटील तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर महाले यांचे अनमोल सहकार्य लाभले.

या तीर्थयात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी अमळनेर महिला मंच ट्रस्टच्या अध्यक्षा कांचन शहा, उपाध्यक्षा तिलोत्तमा पाटील, सरोज भांडारकर, सचिव वसुंधरा लांडगे, कोषाध्यक्ष प्रा. शीला पाटील, कार्यकारिणी सदस्य भारती गाला, विजया जैन, करुणा सोनार, पद्मजा पाटील, विद्या हजारे, माधुरी पाटील, डॉ. मंजुश्री जैन तसेच राजश्री पाटील आणि अरुण पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

विठ्ठलनामाचा गजर, संतांचे आशीर्वाद आणि सेवाभावाची प्रेरणा घेऊन परतलेल्या अमळनेर महिला मंचच्या भगिनींसाठी ही तीर्थयात्रा आयुष्यभर स्मरणात राहणारी भक्तीची अनमोल पर्वणी ठरली.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीमहिला पत्रकारितेच्या संवर्धनाचा संकल्प; लातूर अधिवेशनाचा उत्साहात समारोप! सत्तेला प्रश्न विचारा, तंत्रज्ञान स्वीकारा; कर्तृत्वातून स्वतःला सिद्ध करा! , डॉ. कविता राणे, प्रा. डॉ. आशा देशपांडे यांचे परखड मार्गदर्शन; महिला पत्रकारांच्या संघटनात्मक बळकटी पुढील बातमी →तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी विद्यामंदिरचा प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड! ,‘प्रकाशाचे परावर्तन व दैनंदिन जीवनातील उपयोग’ या वैज्ञानिक उपकरणाची बाजी; शिक्षक गटातही तृतीय क्रमांक पटकावत विद्यालयाची दुहेरी यशस्वी कामगिरी

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!