Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
महाराष्ट्र विशेष बातमी

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी विद्यामंदिरचा प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड! ,‘प्रकाशाचे परावर्तन व दैनंदिन जीवनातील उपयोग’ या वैज्ञानिक उपकरणाची बाजी; शिक्षक गटातही तृतीय क्रमांक पटकावत विद्यालयाची दुहेरी यशस्वी कामगिरी

ईश्वर रामदास महाजन 26 Oct 2026, 11:52 1.1K views अपडेटेड 27 Oct 2026, 23:48 6 min read
🔧 साधने:
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी विद्यामंदिरचा प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड!     ,‘प्रकाशाचे परावर्तन व दैनंदिन जीवनातील उपयोग’ या वैज्ञानिक उपकरणाची बाजी; शिक्षक गटातही तृतीय क्रमांक पटकावत विद्यालयाची दुहेरी यशस्वी कामगिरी

अमळनेर, प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेला, संशोधनवृत्तीला आणि नावीन्यपूर्ण प्रयोगशीलतेला चालना देणाऱ्या ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अमळनेर येथील साने गुरुजी विद्यामंदिरने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयाच्या योगांक्षी संजीव पाटील आणि तेजस्विनी विशाल भोसले या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ‘प्रकाशाचे परावर्तन व त्याचा दैनंदिन जीवनात होणारा उपयोग’ या वैज्ञानिक उपकरणाने प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे, या प्रकल्पाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली असून, विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

पंचायत समिती, अमळनेर आणि बी. वाय. चौधरी माध्यमिक विद्यालय, शिरसाळे यांच्या संयुक्त विद्यमाने ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित उपकरणे आणि प्रयोग सादर करून आपल्यातील संशोधनशीलतेचे दर्शन घडविले.

या विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी विद्यामंदिरच्या योगांक्षी पाटील आणि तेजस्विनी भोसले यांनी प्रकाशाच्या परावर्तनाचे वैज्ञानिक तत्त्व आणि त्याचा दैनंदिन जीवनातील उपयोग या विषयावर आधारित उपकरण सादर केले. त्यांच्या कल्पकतेला आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाने गौरविण्यात आले.

शिक्षक गटातही विद्यालयाचा ठसा

विद्यार्थिनींच्या यशाबरोबरच विद्यालयातील शिक्षक श्री. उमेश पाटील यांनीही शिक्षक गटातून तृतीय क्रमांक प्राप्त करून विद्यालयाच्या यशात मोलाची भर घातली. विद्यार्थी आणि शिक्षक अशा दोन्ही गटांत मिळालेल्या यशामुळे साने गुरुजी विद्यामंदिरच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विज्ञानविषयक उपक्रमांचीही प्रचिती आली.

मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांचा गौरव

या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. संजय शिरोळे उपस्थित होते. प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई पाटील उपस्थित होत्या.

पारितोषिक वितरण समारंभास उपविभागीय अधिकारी श्री. मयूर भंगाळे, तहसीलदार डॉ. उमा ढेकळे, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रमोद पाटील यांच्यासह सर्व केंद्रप्रमुख, गणित मंडळ व विज्ञान मंडळाचे पदाधिकारी तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी विजेत्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात आले.

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड; विद्यालयात आनंदाचे वातावरण

तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या वैज्ञानिक प्रकल्पाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाल्याने विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशामुळे विद्यार्थिनींना आपली वैज्ञानिक कल्पकता आणि प्रयोगशीलता जिल्हास्तरावर सादर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. हेमकांत पाटील, सचिव श्री. संदीप घोरपडे, सर्व संचालक, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजीव पाटील, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेत्या विद्यार्थिनी व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

**वैज्ञानिक दृष्टिकोन, कल्पकता आणि प्रयोगशीलतेच्या बळावर साने गुरुजी विद्यामंदिरने मिळविलेले हे यश विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वाटचालीचे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.**

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीअमळनेर महिला मंचच्या ४९ महिलांची पंढरपूर वारी; विठुरायाच्या चरणी भक्तिरसात न्हाऊन निघाली भजनांजली! प.पू. ह.भ.प. प्रसाद महाराजांच्या आशीर्वादाने तीन दिवसीय तीर्थयात्रा उत्साहात संपन्न; पुढील बातमी →अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!