सरदार पटेल जयंती, राष्ट्रीय एकात्मता दिन, हिंदू रत्न पुरस्कार वितरण समारंभाचे पुणे येथे आयोजन

सरदार पटेल जयंती, राष्ट्रीय एकात्मता दिन, हिंदू रत्न पुरस्कार वितरण समारंभाचे पुणे येथे आयोजन
डॉ पांडुरंग सराफ, ममता पाटील, विजयमाला पवार यांना पुरस्कार जाहीर
उरुळी कांचन: अखंड भारताचे शिल्पकार लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल जयंती कार्यक्रम व राष्ट्रीय एकात्मता दिन कार्यक्रम पुणे येथे होणार आहे. यावेळी समर्पित भावनेने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सेवाव्रती कार्यकर्त्यांना भारतरत्न सरदार पटेल हिंदू रत्न पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन पद्मश्री डॉ मणी भाई देसाई मानव सेवा ट्रस्ट युवक क्रीडा मंत्रालय, निती आयोग भारत सरकार सलग्नित संस्थेच्या वतीने करण्यात आल्याचे ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार संस्थेचे अध्यक्ष संस्थापक डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे माहिती दिली. हा कार्यक्रम 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते नऊ दरम्यान संकल्प बँक्वेट हॉल एलबीएस मार्ग नवी पेठ पुणे येथे होणार आहे. या कार्यक्रमाला माननीय रवींद्र साठे अध्यक्ष खादी व ग्रामोद्योग राज्यमंत्री दर्जा स्वतंत्र विभाग मंत्रालय मुंबई ,हे प्रमुख पाहुणे असून यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावर्षीच्या सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये डॉ. पांडुरंग दगडू सराफ (सामाजिक धार्मिक , धार्मिक ,शैक्षणिक, कार्य )साकेगाव जळगाव,(सौ ममता यशवंत पाटील (शासकीय सामाजिक कार्य) मा.राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक मुंबई, माननीय सौ विजय माला महादेव पवार (उत्कृष्ट तपास पुरस्कार) वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरुळी कांचन पोलीस स्टेशन पुणे, डॉ.सुरेश जगन्नाथ रौंदळे (सामाजिक धार्मिक कार्य) निमखेड बाजार, रश्मी नरेंद्र जोशी (सामाजिक) मुंबई, डॉ. स्मिता विनायक सहस्रबुद्धे ( साहित्यिक शैक्षणिक) पुणे, डॉ.हरी निवृत्ती पाटील (सामाजिक , अध्यात्मिक) औंध पुणे, प्रल्हाद गोपाळ खर्चे (चीफ ब्युरो राष्ट्रीय प्रसार नॅशनल न्यूज )नई दिल्ली, वासुदेव रामभाऊ भंगाळे (सामाजिक/ सहकार) मुक्ताईनगर, डॉ.रघुनाथ महादू पाचपांडे (सामाजिक वैद्यकीय आदर्श शेती) मुक्ताईनगर, राजेश दातार(शास्त्रीय उपशास्त्रीय सुगम संगीत गायक) पुणे जगन्नाथ विठ्ठल जगताप (वैद्यकीय सामाजिक कार्य) जळगाव सुपे, दिलीप गोविंदराव डहाके (समाज प्रबोधन छंद सम्राट) पुणे संदीप भानुदास तापकीर (इतिहास अभ्यासक लेखक संपादक साहित्यिक) चरोली पुणे,रामचंद्र पांडुरंग ढाके (सामाजिक धार्मिक) भुसावळ, आपले परिवार सार्वजनिक वाचनालय (आदर्श ग्रंथालय पुरस्कार) संचालक शांताराम जगन्नाथ पाटील भुसावळ, प्रमोद नारायण सरोदे (सामाजिक) भुसावळ, आशा कैलास पाटील (नगरसेविका सामाजिक कार्य) भुसावळ, ह भ प दीपक प्रल्हाद पाटील (प्रवचनकार कीर्तनकार) भुसावळ, हरी प्रल्हाद बढे ( अध्यात्मिक सामाजिक कार्य) वडगाव शेरी, ह भ प तुषार शरद चौधरी (प्रवचनकार कीर्तनकार) नायगाव पेठ हवेली पुणे, रोहिदास विष्णू मुरकुटे (आध्यात्मिक कार्य) उरुळी कांचन, डॉ. राहुल बाळकृष्ण भोसले (साहित्यिक पत्रकार) पुणे, किरण लक्ष्मण तोडकर सूर्यवंशी (कवी साहित्यिक) सातारा नहरवाडी,टी. के महाडिक (सामाजिक कार्य )शिंदवणे, अंकुश तुकाराम भोरडे (दिव्यांग सेवा) पुणे, चंद्रकांत प्रभाकर काटे (शैक्षणिक )बोरी दौंड, अविनाश आनंदराव पवार (शैक्षणिक )फलटण, गजानन प्रल्हादराव ताठे (सामाजिक धार्मिक कार्य) अंजनगावअमरावती, अजित सुरेश वडगावकर (समाजसेवा मानव सेवा) आळंदी पुणे, अमोल पंजाबराव वानखेडे ( हिंदू धर्माचे प्रसारक अकोला) जिल्हा अकोला, श्रीमती उज्वला नवले (शैक्षणिक कार्य )येरवडा, सोनाली योगेश शिनगारे (दिव्यांग क्षेत्र) कोरेगाव-भीमा, राम कृष्ण हरीला देवरे (समाजसेवा सामाजिक कार्य) निगडी प्राधिकरण, विठ्ठल नारायण शिंदे (जलसंधारण नदी स्वच्छता अभियान) आळंदी देवाची पुणे, लक्ष्मण निवृत्ती शिंदे (वनसंवर्धन पर्यावरण क्षेत्र नसरापुर) तालुका भोर जिल्हा पुणे, विजया शिवा राठोड( शिक्षण क्षेत्र) पुसद यवतमाळ, अंगी राज शिंदे( विधीक्षेत्र )लातूर, योगेश गोपाल भंडारे (समाजसेवा चिंचवड )पुणे, रोहित आप्पा कंद( आदर्श शेती सामाजिक) लोणीकंद, कीर्ती नितीन परासकर (आधुनिक तंत्रज्ञान) मोशी पुणे, विष्णुकांत नारायण नसुर्डे (व्यवसायिक सामाजिक )पाषाण, संजय रामनाथ टाकळकर (राजकीय सामाजिक )शेवगाव, प्रकाश रावसाहेब लबडे( सामाजिक व धार्मिक )मुगलवाडी पैठण , आसाराम पांडुरंग मडके ,(सहकार व शेती), गदेवाडी अ नगर, बाबासाहेब कृष्णराव लबडे, (कृषी क्षेत्र सामाजिक) शेवगाव अनगर, रवींद्र पंढरीनाथ उगलमुगले( ज्येष्ठ पत्रकार) सोलापूर अ नगर, विजय चंद्रकांत जगधने (आदर्श कुटुंबप्रमुख सामाजिक )अंतरवाली अ नगर, रमेश शांताभाई कचरे (कृषी सेवा सामाजिक) शेवगाव नगर, संजय रामराव नरवाडे (आरोग्यसेवा) तिसगाव अनगर, ज्ञानेश्वर भानुदास भागवत (आदर्श शेतकरी सामाजिक) एरंडगाव अ नगर, श्रीकृष्ण बाजीराव भागवत (कृषी सेवा सामाजिक) एरंडगाव अनगर, शिवशाहीर कल्याणजी काळे, (सामाजिक कार्य प्रबोधन जनजागृती )शेवगाव अहमदनगर, गजानन श्रीरामजी काळपांडे (राजकीय सामाजिक कार्य) निमखेड बाजार अमरावती, सुभाष वासुदेव वानखेडे (शैक्षणिक सामाजिक) निमखेड बाजार अमरावती, विठ्ठल खंडूजी पातोंड, (सामाजिक धार्मिक) पुंडलिक नगर अकोला, प्रशांत भीमराव भंडारी (सामाजिक दिव्यांग सेवा) दौंड , सुधीर भगवान डेंगळे सामाजिक कार्य दौंड, सूर्यभान वामन अल्हाट सामाजिक अध्यात्मिक बदलापूर, लालासाहेब सोपान जाधव ( शैक्षणिक)गिरीम, विवेक भागचंद शेलार (शैक्षणिक ) कोळगाव, डॉ. ज्ञानेश्वर गणपत करपे (शैक्षणिक) श्रीगोंदा, प्रा. सागर जयसिंग रोडे (शैक्षणिक,) जंगलेवाडी, ऋतुजा अशोक भोसले ( शैक्षणिक)वरवंड, स्वप्निल रावसाहेब साठे (सामाजिक) काष्टी , सौ प्रतिभा अरविंद मांडे मढे वडगाव (सामाजिक शैक्षणिक), निलेश विनायकराव खताळ (शैक्षणिक )गिरीम, संदीप रामदास नरसाळेसामाजिक कोरेगाव पारनेरयांच्यासह कार्यकर्त्यांना भारतरत्न सरदार वल्लभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार प्रदान केले जाणार आहे, अशी माहिती पद्मश्री डॉ मणी भाई देसाई मानव सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष संस्थापक डॉ. रवींद्र भोळे ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार अपंग सेवक यांनी दिली आहे. यावेळी सुभाष कट्यारमल यांचे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
अमळनेर महिला मंचच्या ४९ महिलांची पंढरपूर वारी; विठुरायाच्या ...
अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प...
अमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवे...
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी विद्यामंदिरचा प्...
अमळनेरमध्ये काँग्रेसच्या ‘वोट बचाव, देश बचाव’ अभियानाचा निर्...
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच ह...