Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
महाराष्ट्र विशेष बातमी

जानवे येथे कुलदैवत "आई भवानी" मातेची भक्ती, व श्रद्धेने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची सांगता

ईश्वर रामदास महाजन 21 Oct 2026, 04:25 1K views अपडेटेड 25 Oct 2026, 00:20 7 min read
🔧 साधने:
जानवे येथे कुलदैवत "आई भवानी" मातेची भक्ती, व श्रद्धेने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची सांगता

अमळनेर प्रतिनिधी

अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता म्हणजे मनाला आनंद देणारा पण तितकाच हुरहुर लावणारा क्षण. गेले दहा दिवस जानवे गावातील प्रत्येक घराघरात भक्तीचे एक वेगळेच वातावरण अनुभवायला मिळाले.

भजन, कीर्तन, अन्नदान आणि अखंड चालणारा हरिनामाचा जप यामुळे संपूर्ण गावात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती. गावातील तरुण वर्गाचा उत्साह, ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि माता-भगिनींची निष्ठा यामुळेच हा सोहळा अत्यंत प्रेक्षणीय आणि यशस्वी झाला.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मोलाचे योगदान दिले, त्या सर्व ग्रामस्थांचे व भाविकांचे मनःपूर्वक धन्यवाद!

विठुराया सर्वांना उदंड आयुष्य, आरोग्य आणि समाधान देवो हीच श्रींच्या चरणी प्रार्थना!

*माऊली भजनी मंडळाचे मोलाचे सहकार्य*:-जानवे येथील "माऊली भजनी मंडळाची" कार्यक्रमाला मोलाची साथ लाभली. विणेकरी, मृदुंगाचार्य, गायनाचार्य व टाळकरी, भालदार, चोपदार व साऊंड सिस्टिम या सर्वांचे येणाऱ्या प्रत्येक कीर्तनकार महाराजांनी तोंड भरून कौतुक केले सर्व कलागुणांनी युक्त असं भजनी मंडळ

आपल्या जानवे गावात आहे. व हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आतापासूनच *बाल गोपाळ भजनी* मंडळ मोठ्यांच्या मार्गदर्शनाने शिकत आहे ही गावाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.

*मृदुंगाचार्य* :-श्री ह भ प जयेश महाराज दुसाने कर यांच्या कलेचे मनापासून कौतुक.

*महाप्रसादाचे मानकरी* :- ग.भा. प्रमिलाबाई तुळशीराम मोरे

श्री ह. भ .प. भिला तुळशीराम मोरे

सौ. ह .भ. प. सुनीताबाई भिला मोरे

*व्यवस्थापक मंडळाचे उत्कृष्ट कार्य* :-आई भवानी मातेच्या मंदिराचे व्यवस्थापक मंडळाने दहा दिवस उत्तम पद्धतीने व्यवस्थापन केले याबद्दल व्यवस्थापक मंडळाचे मनापासून कौतुक व अभिनंदन

*कार्यक्रमाला यांची लाभली उपस्थिती* :-तालुक्याचे ज्येष्ठ नेते मा.आ. आबासाहेब डॉ बी एस पाटील, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दादासाहेब श्री अनिल भाईदास पाटील, माजी नगराध्यक्ष सौ जयश्रीताई पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती श्री श्याम बापू अहिरे व बाहेरगावाहून आलेले पाहुणे मंडळी पंचक्रोशीत तील भजनी मंडळांची उपस्थिती लाभली.

" *दोन" हरिनाम कीर्तन सप्ताहांमुळे गावाची अनोखी ओळख* :-जानवे गावात नवरात्र उत्सवामध्ये कुलदैवत आई भवानी मातेचा गेल्या 28 वर्षापासून सुरू असलेला पहिला कीर्तन सप्ताह व गावातील *विठ्ठल रुक्मिणी माता मंदिराचा* वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाशिवरात्रीच्या पर्वात होणारा दुसरा संकीर्तन सप्ताह गेल्या दोन वर्षापासून सुरू झालेला आहे अशा दोन्ही कीर्तन सप्ताहांमध्ये गावकऱ्यांचे भाविक भक्तांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य असते व या दोन किर्तन सप्ताहांमुळे सर्वत्र गावाच्या भक्ती भावाचे कौतुक केले जाते.

*बहिरम महाराज यात्रा उत्सव* :-मार्गशीर्ष महिन्यात नागपंचमीला जानवे गावाचे *ग्रामदैवत* श्री बहिरम महाराजांची यात्रा भरते जानवे पंचक्रोशीत ही यात्रा मोठी असते यात्रेच्या निमित्ताने अमावस्येच्या आदल्या दिवशी कीर्तनाचा जागर केला जातो व श्रद्धेने अमावस्येच्या दिवशी भाविक मनोभावे महाप्रसादाचे आयोजन करतात.

*कृषी क्षेत्रात गावाची भरभराट* :-ज्याप्रमाणे धार्मिक कार्यामध्ये गावाचा नावलौकिक आहे त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रात तालुक्यात कापसाचे उत्पन्न काढण्याच्या बाबतीत नावलौकिक आहे अतिशय कष्टाळू व मेहनती लोक या गावात आहेत म्हणून कितीही दुष्काळाचे सावट असले तरी गावात लोकांना चांगल्या प्रकारे उत्पन्न येतं ही कुलदैवत आई भवानी व ग्रामदैवत बहिरम महाराज यांची कृपा आशीर्वाद म्हणावा लागेल.

गावातील अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे निमित्ताने मला आलेले अनुभव माझ्या मनातील भावना मी या ठिकाणी शब्दांकित केलेले आहे. याच्यात जे चुकीचे असेल ते माझे समजा. जे बरोबर असेल ते गावातील सर्व ज्येष्ठ- श्रेष्ठ , माता भगिनी यांचे आशीर्वाद तरुण युवकांचे सहकार्य या साऱ्यांच्या प्रेरणेने हा भक्तीरसाचा सोहळा जानवे नगरीत संपन्न झाला सर्वांचे मनापासून धन्यवाद!

शब्दांकन

डी एम पाटील सर

अध्यक्ष:-साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय, जानवे

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीपत्रकारांनी संघटीत शक्तीचे महत्व व उध्देशांवर चिंतन केले पाहिजे...! संजय एम.देशमुख* , *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या मुंबई-कोकण विचारमंथन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद,शहिद जवान ईतर बळी व स्व.नाना पाटेकरांना श्रध्दांजली!* , पुढील बातमी →माळी महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा; राज्यभर संघटन बळकटीकरणावर भर , प्रदेशाध्यक्षपदी अरुणराव तिखे; प्रदेश कार्यकारिणी, विभागीय अध्यक्ष आणि विविध आघाड्यांच्या प्रमुखांची नियुक्ती

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!