Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
महाराष्ट्र विशेष बातमी

माळी महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा; राज्यभर संघटन बळकटीकरणावर भर , प्रदेशाध्यक्षपदी अरुणराव तिखे; प्रदेश कार्यकारिणी, विभागीय अध्यक्ष आणि विविध आघाड्यांच्या प्रमुखांची नियुक्ती

ईश्वर रामदास महाजन 21 Oct 2026, 07:35 1.1K views अपडेटेड 27 Oct 2026, 12:28 10 min read
🔧 साधने:
माळी महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा; राज्यभर संघटन बळकटीकरणावर भर ,    प्रदेशाध्यक्षपदी अरुणराव तिखे; प्रदेश कार्यकारिणी, विभागीय अध्यक्ष आणि विविध आघाड्यांच्या प्रमुखांची नियुक्ती

मुंबई प्रतिनिधी-

महाराष्ट्र माळी महासंघाच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी आणि महाराष्ट्रातील माळी समाजाचे संघटन अधिक व्यापक, सक्षम व प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी, विभागीय अध्यक्ष आणि विविध आघाड्यांच्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मा. अविनाश नीलकंठराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही संघटनात्मक बांधणी करण्यात येत असून, महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये महासंघाचे कार्य अधिक गतिमान करण्यावर भर देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी अरुणराव तिखे (चंद्रपूर) यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून राज्यभर संघटनेचा विस्तार करणे, जिल्हा व तालुकास्तरावरील संघटन मजबूत करणे, युवक व महिलांना नेतृत्वाची संधी देणे आणि समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे, हा या संघटनात्मक विस्तारामागील प्रमुख उद्देश आहे.

सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात माळी समाजाची प्रगती साधण्यासाठी संघटित प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांतील पदाधिकाऱ्यांच्या सहभागातून समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणे, सामाजिक उपक्रमांना चालना देणे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे, अशी महासंघाची भूमिका आहे.

महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी

माळी महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून अरुणराव तिखे (चंद्रपूर, नागपूर विभाग) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महासचिवपदी प्रा. नानासाहेब कांडलकर (जळगाव जामोद, अमरावती विभाग) आणि प्रा. डॉ. श्रीकांत भुसारी (पवनी, भंडारा, नागपूर विभाग) यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

कोषाध्यक्षपदी डॉ. श्रीकृष्णराव गोरडे (पथ्रोट, अमरावती विभाग), तर सहकोषाध्यक्षपदी रविंद्रजी ढोकणे (दर्यापूर, अमरावती विभाग) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उपाध्यक्षपदी ज्युलीताई गोडे (खडके), पुणे; राजेशजी जावरकर, अकोला; ज्योतीताई देवघरे, नागपूर; आसारामजी वीरकर, संभाजीनगर; अॅड. माधवराव खेरडे, पनवेल; संजय निवृत्तीराव म्हेत्रे, लातूर-सोलापूर विभाग; तसेच सोनालीताई भांदुरे, नाशिक विभाग यांचा समावेश आहे.

सचिवपदी गुरू गुरुनले (मूल, नागपूर विभाग), संदीपजी भुस्कट (अकोट, अमरावती विभाग), गजेंद्रजी महाजन (भुसावळ, नाशिक विभाग), गौरीताई पिंगळे (पुणे विभाग), हेमंत भाष्कर (मुंबई विभाग), संजीवनीताई राऊत (बीड, मराठवाडा विभाग) आणि प्रा. संदिप गोरे (बसमत, हिंगोली, मराठवाडा विभाग) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटन सचिव तथा मीडिया प्रमुख म्हणून चंद्रशेखर दरवडे (शिक्रापूर, पुणे विभाग) यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून विठ्ठलराव वानखडे (पुलगाव, नागपूर विभाग) आणि हनुमंतराव लिंगे (सांगली) यांचा समावेश आहे.

विभागीय अध्यक्षांची नियुक्ती

राज्याच्या विविध विभागांमध्ये संघटनेचा समन्वय आणि विस्तार प्रभावीपणे व्हावा, यासाठी विभागीय अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नागपूर विभागासाठी मुकुंदराव पोटदुखे (नागपूर), अमरावती विभागासाठी अशोकराव तिखे (यवतमाळ), मराठवाडा विभागासाठी देवनाथजी जाधव (जालना), उत्तर महाराष्ट्र विभागासाठी प्रा. प्रमोद तांबे (नगर), मुंबई-कोकण विभागासाठी दिनेशजी टाकरखेडे (कुर्ला ईस्ट, मुंबई) आणि सोलापूर विभागासाठी सुधाकरजी जांभळे (अकोले काटी, सोलापूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे विभागाचे अध्यक्षपद सध्या रिक्त ठेवण्यात आले आहे.

विविध आघाड्यांच्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा

माळी महासंघाच्या कार्याचा विस्तार विविध व्यावसायिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत करण्यासाठी स्वतंत्र आघाड्यांची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे.

वैद्यकीय आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ. संजयजी घाटे (चंद्रपूर, नागपूर विभाग), महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी गायत्रीताई लडकत (पुणे), अधिकारी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रशांत वावगे (नागपूर), किसान आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी सोमनाथजी राऊत (सांगोला, सोलापूर विभाग) आणि सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रज्वल भोयर (नागपूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

युवक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी सुयश श्रीखंडे (अमरावती) यांची नियुक्ती झाली आहे. युवक आघाडीच्या महासचिवपदी परमेश्वर बनकर (मुंबई), रोहन खंडाळकर (भंडारा) आणि लक्ष्मण सर्जेराव घनवट (जालना) यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

प्राध्यापक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी प्राचार्य डॉ. ईश्वर मोहुर्ले (गोंदिया, नागपूर विभाग), अभियंता आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी राधेश्यामजी चरडे (पुणे), ज्येष्ठ नागरिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी केशवरावजी दहीकर (अमरावती विभाग), विधी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रकाशजी माळी (मुंबई) आणि युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी तृषाली सत्यवान भास्कर (मुंबई) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटनात्मक विस्तारातून समाजाच्या प्रगतीचा संकल्प

माळी महासंघाच्या नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून राज्यभर संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, विभागीय स्तरावर समन्वय वाढवणे आणि जिल्हा व तालुकास्तरावर संघटनेचे कार्य अधिक प्रभावी करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे.

महिला, युवक, विद्यार्थी, शेतकरी, उद्योजक, अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, वैद्यकीय व्यावसायिक, अभियंते आणि विधी क्षेत्रातील समाजबांधवांना संघटनेच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्यांचा समाजहितासाठी उपयोग करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात संघटनेची ध्येयधोरणे प्रभावीपणे राबवावीत, समाजातील प्रश्न समजून घेऊन त्यावर विधायक मार्गाने काम करावे आणि सामाजिक एकजूट अधिक बळकट करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

माळी महासंघाच्या वतीने सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

आदेशानुसार : अरुण तिखे, प्रदेशाध्यक्ष, माळी महासंघ, महाराष्ट्र प्रदेश

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीजानवे येथे कुलदैवत "आई भवानी" मातेची भक्ती, व श्रद्धेने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची सांगता पुढील बातमी →तरुणांनो, व्याधी होण्याची वाट पाहू नका; निरोगी भविष्यासाठी आजपासूनच योग करा! , योग ही केवळ उपचारपद्धती नव्हे, तर निरोगी शरीर, शांत मन आणि एकाग्र बुद्धीची गुरुकिल्ली!, योगशिक्षिका सौ. ज्योती रामराव पाटील यांचे तरुण पिढीला आरोग्यदायी जीवनशैलीचे आवाहन

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!