Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
महाराष्ट्र विशेष बातमी

पत्रकारांनी संघटीत शक्तीचे महत्व व उध्देशांवर चिंतन केले पाहिजे...! संजय एम.देशमुख* , *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या मुंबई-कोकण विचारमंथन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद,शहिद जवान ईतर बळी व स्व.नाना पाटेकरांना श्रध्दांजली!* ,

ईश्वर रामदास महाजन 20 Oct 2026, 16:35 996 views अपडेटेड 25 Oct 2026, 11:00 7 min read
🔧 साधने:
पत्रकारांनी संघटीत शक्तीचे महत्व व उध्देशांवर चिंतन केले पाहिजे...! संजय एम.देशमुख*  ,  *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या मुंबई-कोकण विचारमंथन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद,शहिद जवान ईतर बळी व स्व.नाना पाटेकरांना श्रध्दांजली!*   ,

*अकोला/ मुंबई-* सामाजिक ऋणाची जाणीव ठेऊन पत्रकारांनी स्वतःसोबतच समाजाचेही प्रश्न प्रखरतेने उचलून खऱ्या कृतीशील पत्रकारितेचा परिचय दिला पाहिजे. सभा, मार्गदर्शन मेळाव्यातून पत्रकारितेची कौशल्ये विकसित करीत समाज आणि पत्रकारांना न्याय देण्यासाठी संघटनशक्तीचे महत्व आणि उध्देशांवर चिंतन केले पाहिजे. लोकशाहीचे रक्षण व संविधानाचे संवर्धन करीत समाज आणि पत्रकारांसाठी शक्तीशाली व्यापक लढा उभारण्यासाठी एकत्र आलं पाहिजे.असे प्रतिपादन लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी केले.यावेळी सर्व प्रथम लोकस्वातंत्र्य अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगे बाबा व महापुरूषांना वंदन- अभिवादन करण्यात आले.देशातील शाहिद जवान,रंगभूमी कलावंत व‌ समाजसेवक स्व.नाना पाटेकर,युवा विद्यार्थी महिला व शेतकरी बळी,दिवंगत पत्रकार तथा अपघात व आपत्तीग्रस्त बळींना श्रध्दांजली देण्यात आली.अतिथींचे सन्मान करण्यात आले.

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मुंबई-कोकण विभागाचा १७ वा पत्रकार मासिक विचारमंथन,मार्गदर्शन तथा सन्मान समारंभ दादरमधील विदर्भ वैभव मंदिरामध्ये संपन्न झाला.याप्रसंगी लोकस्वातंत्र्यचे राष्ट्रीय पदाधिकारी कादंबरीकार पुष्पराज गावंडे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तर संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख, मुंबईतील शौर्य फाउंडेशनचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे दापोली संपर्क प्रमुख प्रवीण लाड, लोकस्वातंत्र्य महाराष्ट्र संघटन प्रमुख अरविंदराव देशमुख, मुंबई-कोकण पदाधिकारी विनोद चाळके,सैनिक फेडरेशनचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष रामराव देशमुख, कमलेश कुबल,यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संजय देशमुख यांनी विविध निकष शिथील करण्याच्या मागण्या शासनाकडे केलेल्या आहेत.म्हणून पत्रकारांंनी केवळ शासनाविरूध्द आरडाओरड न करता वस्तूस्थिती लक्षात घेऊन मेहनतीने अनुभवसमृद्ध होण्याचे प्रयत्न सुध्दा केले पाहिजेत.ही आवश्यकता सुध्दा बोलतांना विषद केली.याप्रसंगी लोकस्वातंत्र्यला पुढे घेऊन जाण्यासाठी सतत सक्रिय असणारे मुंबई -कोकण विभाग पदाधिकारी,संवेदना फाऊंडेशनचे विनोद चाळके यांना केक कापून जन्मदिनाचे अभिष्टचिंतन करून त्यांना जल्लोषात सामुहिक शुभेच्छा देण्याचा एक भावनिक उपक्रम काल संपन्न झाला‌.

रामराव देशमुख यांनी देशाचे रक्षण हे सैनिकांचे तर लोकशाही आणि समाजाचे रक्षण हे पत्रकारांचे कर्तव्य असल्याच्या भावना व्यक्त केल्या.प्रवीण लाड व पुष्पराज गावंडे यांनीही संघटनेचा प्रभाव,महत्व विषद करून संघटन वाढवण्याची आवाहने केली.नव्या सभासदांची शृंखला तर निरंतर सुरू आहेच‌.परंतू रत्नागिरी येथील १ महिलाआणि २ सभासदांसह दैनिक पुढारी आणि नवशक्तीचे पत्रकार असे १० सभासद कालच्या कार्यक्रमात लोकस्वातंत्र्यच्या चळवळीत नव्याने सहभागी झाले. याप्रसंगी बोईसरचे जयप्रकाश जयस्वाल यांची कोकण विभागीय संघटन- संपर्क प्रमुख,खामगावच्या रामराव देशमुख यांची लोकस्वातंत्र्य सामाजिक सेवा संघाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी तर कमलेश कुबल मुंबई प्रदेश संघटन प्रमुख म्हणून तर जबीना शेख यांना कल्याण तालूका संघटन प्रमुख पदावर नियक्त्त्यांची घोषणा करून त्यांना अध्यक्ष संजय देशमुख यांनी नियुक्तीपत्रे प्रदान केली.

या कार्यक्रमाला कोकण प्रभारी व पालघर जिल्हाध्यक्ष जगदिशप्रसाद करोतिया,जयप्रकाश जयस्वाल,नितीन बोंबाडे,(बोईसर) विकास भोसले (चेंबूर) राजेंद्र आंगणे (सांताक्रूझ) अनिल चासकर (गोरेगाव)उमेश चौधरी (ठाणे) संतोष बारगोडे,सुभाष पाचकुडे, कविता नार्वेकर,संतोष सुर्वे (रत्नागिरी) व अनेक पत्रकार सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाचे उत्कृष्ठ व्यवस्थापन विनोद चाळके,विकास भोसले व सहकाऱ्यांनी तर संचलन नितीन बोंबाडे व आभारप्रदर्शन चाळके यांनी केले‌.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीअमळनेरमध्ये मतचोरीच्या आरोपांविरोधात तीव्र निषेध; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन! , दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर एनएसयूआयच्या वतीने आंदोलन; निष्पक्ष निवडणूक आयोगाची मागणी पुढील बातमी →जानवे येथे कुलदैवत "आई भवानी" मातेची भक्ती, व श्रद्धेने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची सांगता

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!