Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश विशेष बातमी

अमळनेरमध्ये मतचोरीच्या आरोपांविरोधात तीव्र निषेध; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन! , दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर एनएसयूआयच्या वतीने आंदोलन; निष्पक्ष निवडणूक आयोगाची मागणी

ईश्वर रामदास महाजन 20 Oct 2026, 16:19 1.2K views अपडेटेड 27 Oct 2026, 07:09 5 min read
🔧 साधने:
अमळनेरमध्ये मतचोरीच्या आरोपांविरोधात तीव्र निषेध; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन!  ,  दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर एनएसयूआयच्या वतीने आंदोलन; निष्पक्ष निवडणूक आयोगाची मागणी

अमळनेर प्रतिनिधी

लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मागणीसाठी अमळनेर येथे नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) च्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

दसरा हा असत्यावर सत्याचा, अन्यायावर न्यायाचा आणि वाईट प्रवृत्तींवर चांगल्या विचारांचा विजय दर्शविणारा सण आहे. याच पार्श्वभूमीवर, ज्याप्रमाणे दसऱ्याला रावणाचे दहन केले जाते, त्याचप्रमाणे निवडणूक प्रक्रियेतील कथित मतचोरी, गैरप्रकार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविषयी निर्माण झालेल्या प्रश्नांच्या निषेधार्थ हे प्रतीकात्मक पुतळादहन करण्यात आले.

लोकशाहीचा खरा आधार हा जनतेचा मतदानाचा अधिकार असून, त्या अधिकाराचे संरक्षण करण्याची घटनात्मक जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. मात्र, निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल, तर ही बाब देशाच्या लोकशाही व्यवस्थेसाठी अत्यंत चिंताजनक आहे, अशी भूमिका यावेळी एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

निवडणूक आयोग ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या हितासाठी नव्हे, तर देशातील प्रत्येक नागरिकाच्या मताचे संरक्षण करण्यासाठी असलेली स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे मतचोरीच्या आरोपांची स्वतंत्र व पारदर्शक चौकशी करण्यात यावी आणि निवडणूक आयोगाने आपल्या कार्यपद्धतीतून जनतेचा विश्वास कायम राखावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

"दसऱ्याच्या दिवशी आपण रावणाचे दहन करून अन्याय आणि असत्याच्या अंताचा संदेश देतो. आज त्याच भावनेतून लोकशाहीच्या मूल्यांना बाधा पोहोचवणाऱ्या प्रवृत्तींचा आम्ही निषेध करत आहोत. निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचा नव्हे, तर संविधानाचा आणि देशातील सर्वसामान्य जनतेच्या मतदानाच्या अधिकाराचा रक्षक असला पाहिजे. लोकशाहीमध्ये प्रत्येक मत पवित्र आहे आणि त्या मताशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही," अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

लोकशाहीचे रक्षण, संविधानिक संस्थांची स्वायत्तता आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया या मागण्यांसाठी एनएसयूआयच्या वतीने लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनावेळी ॲड. कौस्तुभ पाटील (जिल्हाध्यक्ष, एनएसयूआय), महेश पाटील (जिल्हाध्यक्ष, युवक काँग्रेस), उमेश संदानशिव (तालुकाध्यक्ष, एनएसयूआय), बी. के. सूर्यवंशी (अध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटी), गजेंद्र साळुंखे (शहराध्यक्ष), माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम बापू पाटील, धनगर दला पाटील, मनोज दाजीबा पाटील, संदीप घोरपडे, रज्जाक शेख, सईद तेली, प्रताप पाटील, रोहिदास दाजी पाटील, श्याम पवार, अशोक पवार, पी. वाय. पाटील, दिनेश पवार, मयूर पाटील, हरिभाऊ मारवडकर, बाळा आप्पा पाटील, राजेंद्र भाट, हर्षल जाधव, तौसिफ तेली, अशोक पारधी, नरेश चव्हाण, प्रशांत चव्हाण, हिमांशू पाटील, प्रशांत बाविस्कर, मयंक चव्हाण, हर्षल बडगुजर, आकाश भिल, बंटी खैरनार, प्रवीण पाटील आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीभव्य नवचंडी यागाची ‌‘मंगलमय‌’ पूर्णाहुती; भाविकांची मांदियाळी ,श्री मंगळग्रह मंदिरात नवरात्रोत्सवपर्वात आयोजन; मंत्रोच्चार, महाआरतीने आदिशक्तींचा जागर पुढील बातमी →पत्रकारांनी संघटीत शक्तीचे महत्व व उध्देशांवर चिंतन केले पाहिजे...! संजय एम.देशमुख* , *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या मुंबई-कोकण विचारमंथन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद,शहिद जवान ईतर बळी व स्व.नाना पाटेकरांना श्रध्दांजली!* ,

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!