Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!
खान्देश विशेष बातमी

हिंदी अध्यापक मंडळाच्या सहविचार सभेत गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवाचे नियोजन , हिंदी दिनानिमित्त तालुकास्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेला ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; दिवाळीनंतर बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन

ईश्वर रामदास महाजन 18 Oct 2026, 06:35 1.1K views अपडेटेड 28 Oct 2026, 09:40 9 min read
🔧 साधने:
हिंदी अध्यापक मंडळाच्या सहविचार सभेत गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवाचे नियोजन ,      हिंदी दिनानिमित्त तालुकास्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेला ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; दिवाळीनंतर बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन

अमळनेर प्रतिनिधी : विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेविषयी आवड निर्माण व्हावी, भाषिक ज्ञान समृद्ध व्हावे आणि सामान्य ज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळावी, या उद्देशाने हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने हिंदी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या परीक्षेच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे नियोजन करण्यासाठी हिंदी अध्यापक मंडळाची नुकतीच सहविचार सभा संपन्न झाली. या सभेत परीक्षेचा प्रतिसाद, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि आगामी बक्षीस वितरण समारंभाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

१४ सप्टेंबर हिंदी दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेत अमळनेर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. शालेय विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे महत्त्व समजावे, भाषेवरील प्रभुत्व वाढावे आणि अभ्यासाबरोबरच सामान्य ज्ञानाची आवड निर्माण व्हावी, या दृष्टीने मंडळाचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या यशाचे कौतुक व्हावे, यासाठी मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने दिवाळीनंतर बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र श्रीराम पाटील आणि सचिव दिलीप बळीराम पाटील यांनी दिली.

सभेच्या प्रारंभी हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र श्रीराम पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी हिंदी दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती देत विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या प्रतिसादाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे सचिव तथा ज्येष्ठ शिक्षक श्री. दिलीप बळीराम पाटील होते. आगामी बक्षीस वितरण समारंभाच्या नियोजनासंदर्भात तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि हिंदी शिक्षकांना कळविण्यात येणार आहे. परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना या समारंभात सन्मानित करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या सहविचार सभेला हिंदी अध्यापक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. एन. आर. चौधरी, श्री. आशिष शिंदे, श्री. दीपक पवार, ज्ञानेश्वर इन्शुलकर,

श्री. मुनाफ तडवी, श्री. प्रदीप चौधरी, श्री. सुनील पाटील, श्री. वंजारी सर, श्रीमती योगेश्वरी मॅडम, श्रीमती प्रतिभा जाधव मॅडम, श्रीमती साबे मॅडम, श्री. भोई सर आणि श्री. एन. एल. पाटील यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देणारे उपक्रम सातत्याने राबविणे, हिंदी भाषेच्या अध्ययनाला प्रोत्साहन देणे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा योग्य सन्मान करणे, या दृष्टीने सभेत विचारविनिमय करण्यात आला.

ग्रामीण विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांची यादी

लहान गट

गुणवंत विद्यार्थी

१)

शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे

कु. निशिका भागवत मंगळकर, इयत्ता ७ वी

२ )

सु. हि. मुंदडे हायस्कूल, मारवड

कु. भुवनेश्वर विजय पाटील, इयत्ता ६ वी

३) कै. श्रीराम गबाजीराव सोनवणे हायस्कूल, भरवस |

उमंग शरद पाटील, इयत्ता ७ वी

४ ) के. पी. सोनार माध्यमिक विद्यालय, जैतपीर

खुशवंत अनिल पाटील, इयत्ता ७ वी

५) माध्यमिक विद्यालय, चौबारी

यश अनिल पाटील

लहान गटातील उत्तेजनार्थ विद्यार्थी

१) माध्यमिक विद्यालय, रणाईचे

आयुष प्रमोद बैसाणे

२)

व्ही. झेड. पाटील माध्यमिक विद्यालय, शिरूड

नरेंद्र हेमंत सोनवणे

मोठा गट

१) उदय माध्यमिक विद्यालय, झाडी

जयश्री हिरालाल पाटील, इयत्ता ८ वी

२ )

स्व. आबासो अनिल अंबर पाटील हायस्कूल, मंगरूळ |

पुष्पक आप्पा पाटील, इयत्ता ९ वी

३)

महात्मा फुले हायस्कूल, देवगाव, ता. अमळनेर

विराज अविनाश पाटील, इयत्ता ८ वी

४)

एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालय, लोंढवे |

ऋतुजा भगवान पाटील, इयत्ता ८ वी

५ ) मा. का. पाटील माध्यमिक आश्रमशाळा, रणाईचे

कृष्णा नामदेव बंजारा, इयत्ता १० वी

उत्तेजनार्थ

लोन ग्रुप माध्यमिक विद्यालय लोण

डाँली भटू पाटील

एकात्मता माध्यमिक विद्यालय शहापूर

हेमंत प्रदीप पाटील

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानातून शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन

हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही सामान्य ज्ञान परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरली आहे. अशा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना आपले ज्ञान तपासण्याची संधी मिळते, अभ्यासाची गोडी वाढते आणि स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी प्रेरणा मिळते. दिवाळीनंतर होणाऱ्या बक्षीस वितरण समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्येही उत्सुकता आहे. हिंदी भाषेचा प्रसार, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सन्मान आणि शैक्षणिक क्षेत्रातील सकारात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा मंडळाचा प्रयत्न या माध्यमातून पुढे येत आहे.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीश्री मंगळग्रह मंदिरात उदया भव्य नवचंडी याग , नवरात्रोत्सवानिमित्त दोन सत्रांत मंत्रोच्चार व विधिवत पूजा; सायंकाळी होणार पूर्णाहुती पुढील बातमी →जानवे येथे आई भवानी मातेच्या नवरात्रोत्सवानिमित्त २८ वर्षांपासून अखंड हरिनाम संकीर्तनाची परंपरा! , दहा दिवस भक्तिरसाची पर्वणी; काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन, २०३७ पर्यंत महाप्रसादाचे बुकिंग पूर्ण

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!