Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश विशेष बातमी

अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात महिंद्रा प्राइड क्लासरूमचा सहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न , कौशल्य विकास, आत्मविश्वास आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी

ईश्वर रामदास महाजन 17 Oct 2026, 12:04 1K views अपडेटेड 20 Oct 2026, 10:53 8 min read
🔧 साधने:
अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात महिंद्रा प्राइड क्लासरूमचा सहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न   , कौशल्य विकास, आत्मविश्वास आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी

अमळनेर प्रतिनिधी:

आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून

प्रभावी संवाद कौशल्य, आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण आणि रोजगाराभिमुख कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित स्व. श्री. पी. सी. भांडारकर कॉलेज ऑफ डी. फार्मसी व स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर येथे महिंद्रा ग्रुप CSR आणि नांदी फाउंडेशन, नाशिक यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला सहा दिवसीय “Mahindra Pride Classroom – Skill Development Programme' विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने यशस्वीरीत्या संपन्न झाला.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडवून आणणे आणि त्यांना भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी सक्षम बनविणे हा होता. या प्रशिक्षण कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबतच व्यावसायिक जीवनात आवश्यक असणारी विविध कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली.कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री. योगेश मुंदडे यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. केवळ पदवी प्राप्त करणे पुरेसे नसून उद्योगक्षेत्राच्या अपेक्षांनुसार स्वतमध्ये आवश्यक कौशल्ये विकसित करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. या सहा दिवसीय प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य, आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास आणि रोजगाराच्या विविध संधींबाबत उपयुक्त मार्गदर्शन मिळत असल्याचे नमूद करून त्यांनी विद्यार्थ्यांना या संधीचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन केले.

महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. एम. एस. वाघ यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणामध्ये सक्रिय सहभाग घेऊन स्वतची क्षमता ओळखण्याचे आणि विविध कौशल्ये विकसित करण्याचे आवाहन केले. अशा प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते तसेच भविष्यातील आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय पाटील यांनी फार्मसी क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. औषधनिर्माण उद्योग, गुणवत्ता नियंत्रण, गुणवत्ता हमी, संशोधन व विकास, औषध नियामक क्षेत्र, रुग्णसेवा तसेच उच्च शिक्षण आणि

संशोधन अशा विविध क्षेत्रांमध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्यांना करिअर घडविण्याच्या संधी उपलब्ध आहेत. या संधींचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक ज्ञानासोबत संवाद कौशल्य, व्यावसायिक शिस्त आणि आत्मविश्वास विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे विशेष प्रशिक्षक IIT बॉम्बेचे श्री. तुषार इंगळे आणि श्रीमती रुचिरा सुमित मादणे यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षणाचे महत्त्व आणि व्यावसायिक जीवनातील त्याची उपयुक्तता समजावून सांगितली. त्यांनी विद्यार्थ्यांशी उत्स्फूर्त संवाद साधत विविध कौशल्यांचे महत्त्व स्पष्ट केले. प्रभावी संवाद, योग्य देहबोली, व्यक्तिमत्त्व विकास, मुलाखतीची तयारी, गटचर्चा, वेळेचे नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन या कौशल्यांमुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले.

या सहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्वतची ओळख निर्माण करणे, प्रभावीपणे संवाद साधणे, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीला आत्मविश्वासाने सामोरे जाणे, गटचर्चेत सहभागी होणे, व्यावसायिक शिष्टाचार पाळणे आणि उपलब्ध रोजगाराच्या संधी ओळखणे यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक विकासाला चालना मिळाली असून भविष्यातील करिअरसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास मदत झाली.

संपूर्ण सहा दिवसीय कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. सतीश ब्रम्हणे आणि प्रा. शंतनू पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात कु. अदिती पहाडे यांनी केली, तर श्रीमती स्नेहल वळवी यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, संवाद कौशल्य सुधारणे आणि त्यांना रोजगारक्षम बनविणे या दृष्टीने Mahindra Pride Classroom Skill Development Programme हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. महाविद्यालय, महिंद्रा ग्रुप CSR आणि नांदी फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासासोबतच व्यावसायिक जीवनाची तयारी करण्यासाठी एक उपयुक्त व्यासपीठ उपलब्ध झाले.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीगझलेची मैफल, साहित्यिकांच्या भेटीगाठी अन् आठवणींचा सुंदर प्रवास! , गझलकार-वक्ते प्रदीप निफाडकर यांचा अमळनेर दौरा ठरला आनंददायी; शारदीय व्याख्यानमालेत रसिकांना साहित्याची अनोखी मेजवानी पुढील बातमी →लोकसंस्कृतीची धुरा, समाजसेवेचा वसा! पूजा पाटील यांचा कर्तृत्वाचा ठसा

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!