निरोगी जीवनशैली व मानसिक स्वास्थ्य उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली-- डॉ.हर्षल बारी

जळगांव:-येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे जिल्हाधिकारी कार्यालय व स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने "जागर आरोग्याचा --मुख्यमंत्री आरोग्य संवाद" या राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांशी हितगुज आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी डॉ.सुदर्शन काळे, डॉ.विशाखा पाटील,डॉ.हर्षल बारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत उत्तम,निरोगी आयुष्याचे महत्व अधोरेखित केले. तिन्ही मान्यवरांनी कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बदलती जीवनशैली,मानसिक ताणतणाव,आहाराच्या बदलत्या सवयींचा आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम, पर्यायाने त्यातून जडणाऱ्या विधींबाबत मार्गदर्शन करतांना निरोगी जीवनशैली व मानसिक स्वास्थ्य उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचे विषद केले. यासोबतच युवकांनी व्यसनांपासून लांब राहिलेलेच योग्य असे आवाहन करतांना व्यायामाचे महत्त्व स्पष्ट केले. सामाजिक जबाबदारीचे निर्वाहन अत्यंत जबाबदारीने करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.किरण महाजन, पाहुण्यांचा परिचय प्रा.दिनेश महाजन,तर आभार प्रदर्शन प्रा. स्वप्ना पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.राजश्री महाजन, प्रा.शिल्पा सरोदे, कला आणि वाणिज्य समन्वयक प्रा.उमेश पाटील, विज्ञान शाखा समन्वयक प्रा.गुणवंत वंजारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.शोभना कावळे,प्रा.छाया चौधरी, प्रा. कांचन चौधरी,प्रा.विनोद पावरा, प्रा.उमेश ठाकरे, डॉ. अतुल इंगळे यांचे सह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम...
अमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा ब...
रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरच...
शालार्थ प्रणालीतील वेतन देयकांचा टॅब सुरू करण्यास परवानगी ...
अमळनेरच्या साहित्यिक परंपरेचा अमृतमहोत्सवी जागर! , ‘नवरंग ...
लावण्या लिहिणाऱ्या गीतकाराच्या लेखणीतून उलगडले निसर्गाचे रंग...